संस्थेचे संकल्पक श्रद्धेय वसंतराव दिवेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गेली बारा वर्षे हा महोत्सव सातत्याने आयोजित केला जातो. यानिमित्त करमाळा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित वक्तृत्व स्पर्धेतील ६० गुणवंत बालवक्त्यांना रोख पारितोषिके, सुवर्णपदके, स्मृतिचिन्हे आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ देवस्थानचे विश्वस्त संपतराव (भारतभाऊ) शिंदे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या शुभहस्ते आणि करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी प्रसिद्ध संशोधक डॉ. प्रचिती पुंडे आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. ए. बी. चेडे यांच्या गौरवार्थ भारतीय डाक विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या विशेष टपाल तिकिटांचे अनावरण करण्यात आले.
समाजाच्या विविध क्षेत्रांत निष्ठेने कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाची दखल घेत श्रद्धेय वसंतराव दिवेकर स्मृती पुरस्काराने प्राचार्य मिलिंद फंड, रावसाहेब सावरे, विलासराव नाईकनवरे, रेवणनाथ सुखदेव आदलिंग, नेमचंद शिवदास भुजबळ, मधुकर मारकड, विजयकुमार जाधव, शहाजीराव मोहोळकर, वंदना सोपानराव चोले, सुजाता धोंडीराम कांबळे, परमेश्वर भोगल, सुलोचना गोरे, औदुंबर रोकडे, शिवाजी रोकडे आणि ह.भ.प. मच्छिंद्र शिवदास अभंग यांना सन्मानित करण्यात आले. तसेच ‘स्वच्छ देवळाली’ उपक्रमातील सहभागी ग्रामस्थांचाही सामूहिक गौरव करण्यात आला.
याच सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कारांचेही वितरण झाले. पुरस्कारार्थींच्या वतीने प्राचार्य मिलिंद फंड यांनी आपल्या सेवेची दखल घेतल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी स्मृती पुरस्काराबद्दल आभार मानत उपस्थितांना मौलिक मार्गदर्शन केले. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी राहीबाई पोपेरे यांचे स्वागत करून आपल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
महोत्सवातील सर्वाधिक भावस्पर्शी क्षण ठरला तो करमाळा तालुक्याचे वीरसुपुत्र शहीद मेजर अमोल निलंगे यांच्या स्मरणार्थ यशकल्याणी संस्थेच्या सभागृहाचा ‘शहीद मेजर अमोल निलंगे स्मृतिभवन’ असा नामकरण सोहळा!
मान्यवरांच्या हस्ते पोलीस बँडच्या देशभक्तिपर वाद्यवृंदाच्या निनादात हा सोहळा संपन्न झाला. विद्यार्थी, पालक, शिक्षक, सैनिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने वातावरण देशभक्तीने भारावून गेले. मातृभूमीसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीरपुत्राच्या नावाने सभागृह ओळखले जाणे, हा भावी पिढ्यांसाठी शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेचा चिरंतन संस्कार ठरणार आहे.
पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी आपल्या जीवनानुभवातून उपस्थितांना मौलिक मार्गदर्शन केले. देशी बियाण्यांचे संवर्धन, श्रमप्रतिष्ठा आणि निसर्गाशी असलेले नाते जपणारा त्यांचा जीवनप्रवास विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. डॉ. प्रचिती पुंडे यांनी विद्यार्थ्यांना ज्ञान, संशोधन, आत्मविश्वास आणि भविष्यातील वाटचालीसाठी प्रेरित केले. अध्यक्षीय मनोगतात संपतराव शिंदे-पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी अशा उपक्रमांची नितांत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी ॲड. सविता शिंदे, पीएच.डी. पदवी प्राप्त केल्याबद्दल डॉ. नगरे तसेच १२०० विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून अंतराळाची सफर घडविणारे स्वप्निल काळे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशनचे बाळकृष्ण लावंड, लोकशिक्षक कल्याणराव साळुंके, जयेश पवार, अभियंता अतुल दाभाडे, शीतल करे-पाटील, मालती करे-पाटील सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे सर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे गणेश करे-पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.विष्णू शिंदे यांनी केले, तर आभार आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष अक्रूर शिंदे यांनी मानले.
श्रद्धेय वसंतराव दिवेकर यांच्या स्मृतींना विचारांचा वारसा, समाजसेवकांच्या कर्तृत्वाला कृतज्ञतेचा सन्मान आणि शहीदांच्या बलिदानाला चिरंतन अभिवादन करणारा हा बारावा वसंत महोत्सव करमाळ्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक जीवनातील संस्मरणीय पर्व ठरला आहे.
करमाळा प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिमच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर जिल्हाध्यक्ष…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील यशकल्याणी सेवाभवन येथे श्री. वसंतराव दिवेकर यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘वसंत…
करमाळा प्रतिनिधी, करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये मराठी माध्यमासोबत इयत्ता पहिलीपासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रम…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कमला भवानी देवी मंदिरात शारदीय…
करमाळा प्रतिनिधी : यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था, पुणे (शाखा करमाळा) यांच्या वतीने संस्थेचे संकल्पक…
करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…