Categories: Uncategorized

खुनशी राजकीय प्रवृत्तीमुळे दहिगाव उपसा सिंचन योजनेची वाताहत! २४ गावांपैकी १२ गावांनाही व्यवस्थित पाणी मिळाले नाही- भरत (भाऊ )आवताडे

करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेची विद्यमान आमदार नारायण पाटील यांच्या खुनशी राजकीय प्रवृत्तीमुळे वाताहत झाल्याचा घणाघाती आरोप करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत भाऊ अवताडे यांनी केला. दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनांची सद्यस्थिती, पाणीवाटपातील कथित राजकीय हस्तक्षेप या प्रश्नावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भरत भाऊ अवताडे म्हणाले की, माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या २०१९ ते २०२४ या कार्यकाळात दहिगाव उपसा सिंचन योजनेची आवर्तने सातत्याने आणि नियमितपणे देण्यात आली. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून शेतीला शाश्वत पाणी मिळेल, असा विश्वास शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला. या विश्वासातून पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर फळबागांची लागवड झाली. विविध पिकांसह भाजीपाला लागवडीलाही चालना मिळाली. शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरत असताना तिचे कामकाज अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने बंद नलिका वितरण प्रणालीची कामेही सुरू करण्यात आली होती,
मात्र, २०२४ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर योजनेच्या कामकाजाची स्थिती बदलल्याचा आरोप अवताडे यांनी केला.
योजनेच्या पाइपलाइनला आग लावण्याच्या घटना, राजकीय हेतूने आवर्तने बंद पाडली जाणे आणि राजकीय विरोधी भूमिका घेणाऱ्या गावांना पाणी नाकारले जाणे, अशा प्रकारांमुळे योजनेचे मोठे नुकसान झाले.“२४ गावांसाठी असलेल्या योजनेत १२ गावांनाही व्यवस्थित पाणी मिळाले नाही, ही गंभीर बाब आहे,” असे सांगत अवताडे यांनी पाणीवाटपाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खरीप आवर्तनातून अर्जुननगर, फिसरे, हिसरे, सालसे, आळसुंदे, पांडे,आणि म्हसेवाडी आदी गावांना एक थेंबही पाणी मिळाले नाही. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, पाणी उपलब्ध होईल या आशेवर केलेल्या फळबागा आणि पिकांच्या नियोजनावर विपरीत परिणाम होत आहे.
चौकट –
अपयश झाकण्यासाठी संजयमामा शिंदेंवर आरोप?
दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या सद्यस्थितीची जबाबदारी झटकण्यासाठी आणि स्वतःचे अपयश झाकण्यासाठी माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्यावर आरोप करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही अवताडे यांनी केला. शेतकरी आणि तालुक्यातील जनता सुज्ञ आहे. योजनेच्या पूर्वीच्या कार्यकाळातील स्थिती आणि सध्याची परिस्थिती यांची तुलना करून जनता योग्य तो निष्कर्ष काढू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दहिगाव उपसा सिंचन योजना ही केवळ पाणीपुरवठ्याची योजना नसून करमाळा तालुक्याच्या पूर्व भागातील शेती, फळबागा, भाजीपाला उत्पादन आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्याचा आधार आहे. त्यामुळे पाणीवाटपामध्ये कोणताही राजकीय भेदभाव न करता सर्व पात्र गावांना नियोजनबद्ध आणि न्याय्य पद्धतीने पाणी मिळणे आवश्यक असल्याची भूमिका या पत्रकार परिषदेत मांडण्यात आली.
या पत्रकार परिषदेत पंचायत समितीचे उपसभापती ॲड. अजित विघ्ने, निंभोरे गावचे सरपंच रवींद्र वळेकर, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील, साडे गावचे माजी सरपंच मयूर पाटील, माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे स्वीय सहाय्यक डॉ. विकास वीर, सुजित तात्या बागल यांनीही आपल्या भूमिका मांडल्या आहेत.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा पोलिसांची मोठी कारवाई; ट्रॅक्टर चोरीची बीड-चिखलठाण टोळी जेरबंद तीन ट्रॅक्टर व ट्रॉलीसह ९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त; चार गुन्ह्यांची उकल

करमाळा (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या शेतातून उभे ट्रॅक्टर चोरून नेणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा करमाळा पोलिसांनी पर्दाफाश केला…

1 hour ago

पुणे शिक्षक मतदार संघ कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक संघटनांचा निर्धार मुकुंद साळुंखे सर यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराला वेग

करमाळा प्रतिनिधी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षक संघटना, टीडीएफ आणि भारतीय जनता…

2 days ago

जिल्हा परिषद शाळांत पहिलीपासून सेमी इंग्रजीसाठी दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत शिक्षण विभागाची आढावा बैठक आचारसंहिता संपल्यानंतर अंमलबजावणीला गती देण्याचे नियोजन;

; करमाळा प्रतिनिधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षणाची समान संधी मिळावी आणि जिल्हा परिषद शाळांमधील…

3 days ago

गाव तिथे भाजपा, बूथ तिथे शाखा’ अभियानाला सोलापूर ग्रामीण पश्चिममध्ये सुरुवात संघटनात्मक बांधणीला वेग भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांनी पांडे व धायखिंडी येथे भाजपा शाखांचे उद्घाटन

  करमाळा प्रतिनिधी  : भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिमच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर जिल्हाध्यक्ष…

3 days ago

प्राचार्य मिलिंद फंड यांना जीवनगौरव पुरस्कार पद्मश्री ‘बिजमाता’ राहिबाई पोपेरे यांच्या हस्ते सन्मान; वसंतराव दिवेकर स्मृतिदिनानिमित्त वसंत महोत्सव उत्साहात

करमाळा  प्रतिनिधी करमाळा येथील यशकल्याणी सेवाभवन येथे श्री. वसंतराव दिवेकर यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘वसंत…

4 days ago