दुष्काळामुळे शेतीचे नुकसान, पाणीटंचाई, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि वाढता उत्पादन खर्च अशा अनेक संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात देण्याबरोबरच पाणी, पीक आणि चारा नियोजनाला प्राधान्य देण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली असल्याचे गणेश चिवटे यांनी सांगितले.
“दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही शासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांचे अग्रिम अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय घेतल्याने संकटात सापडलेल्या बळीराजाला दिलासा मिळणार आहे,” असे चिवटे यांनी नमूद केले.
दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या तगाद्यापासून दिलासा देणे, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करणे, जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करणे आणि आवश्यक उपाययोजना राबविणे या बाबींनाही शासनाने प्राधान्य द्यावे,
अशी भूमिका त्यांनी मांडली.
केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या पीएम किसान सन्मान निधी, नमो शेतकरी महासन्मान निधी, प्रधानमंत्री पीकविमा योजना आणि इतर कृषीविषयक योजनांमुळे पात्र शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार मिळत आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली अग्रिम मदत ही या संकटाच्या काळात महत्त्वाची ठरणार असल्याचे चिवटे यांनी सांगितले.
दुष्काळाच्या प्रश्नावर राजकारण करण्याऐवजी शेतकरी आणि ग्रामीण जनतेला दिलासा देण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. शासनाच्या योजनांची माहिती गावागावांत पोहोचवून पात्र शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी भाजपा कार्यकर्ते प्रयत्नशील राहतील, अशी ग्वाही भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांनी दिली.
करमाळा (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या शेतातून उभे ट्रॅक्टर चोरून नेणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा करमाळा पोलिसांनी पर्दाफाश केला…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेची विद्यमान आमदार नारायण…
करमाळा प्रतिनिधी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षक संघटना, टीडीएफ आणि भारतीय जनता…
; करमाळा प्रतिनिधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षणाची समान संधी मिळावी आणि जिल्हा परिषद शाळांमधील…
करमाळा, दि. ११ (प्रतिनिधी) : मातीच्या कुशीत जपलेले बीज उद्याच्या समृद्ध सृष्टीची हमी देते, तर…
करमाळा प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिमच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर जिल्हाध्यक्ष…