Categories: Uncategorized

राष्ट्रीय पत्रकार संरक्षण परिषदेच्या राष्ट्रीय सचिव पदी संजय मस्कर यांची निवड

 

 

करमाळा प्रतिनिधी-
राष्ट्रीय पत्रकार संरक्षण परिषदेच्या राष्ट्रीय सचिव पदी साडे (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील रहिवासी संजय मस्कर यांची निवड करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेश येथील राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. देवेंद्रकुमार मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली व नवी दिल्ली संघटनेचे अवनीश कुमार गुप्ता, प्रमोद शर्मा, राजीव भारती,विनीत शुक्ल, दिलीप श्रीवास्तव, पुष्पेंद्र कुमार शर्मा, आणि अनिल कुमार त्रिपाठी या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह, राष्ट्रीय कार्यकारिणीने ही निवड जाहीर करून त्यांना अधिकृत नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. संजय मस्कर हे नेशनल ब्युरो म्हणून कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना ही संधी देण्यात आली आहे.
या निवडीबद्दल भारत सरकार चे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री बृजेश पाठक व कारागृह एवं जेल राज्यमंत्री सुरेश राही यांनी अभिनंदन केले आहे. या पदाच्या माध्यमातून पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, खोट्याएफआईआर वर लक्ष केंद्रित करणे, पत्रकारांवरील हल्ल्यांना वाचा फोडणे आणि पत्रकार कल्याणासाठी काम करणार असल्याचे नवनिर्वाचित राष्ट्रीय सचिव संजय मस्कर यांनी सांगितले.

saptahikpawanputra

Recent Posts

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य केल्याबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांनी केले देवाभाऊंचे अभिनंदन

  करमाळा प्रतिनिधी - संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती…

8 hours ago

करमाळा पोलिसांची मोठी कारवाई; ट्रॅक्टर चोरीची बीड-चिखलठाण टोळी जेरबंद तीन ट्रॅक्टर व ट्रॉलीसह ९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त; चार गुन्ह्यांची उकल

करमाळा (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या शेतातून उभे ट्रॅक्टर चोरून नेणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा करमाळा पोलिसांनी पर्दाफाश केला…

1 day ago

खुनशी राजकीय प्रवृत्तीमुळे दहिगाव उपसा सिंचन योजनेची वाताहत! २४ गावांपैकी १२ गावांनाही व्यवस्थित पाणी मिळाले नाही- भरत (भाऊ )आवताडे

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेची विद्यमान आमदार नारायण…

1 day ago

पुणे शिक्षक मतदार संघ कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक संघटनांचा निर्धार मुकुंद साळुंखे सर यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराला वेग

करमाळा प्रतिनिधी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षक संघटना, टीडीएफ आणि भारतीय जनता…

3 days ago

जिल्हा परिषद शाळांत पहिलीपासून सेमी इंग्रजीसाठी दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत शिक्षण विभागाची आढावा बैठक आचारसंहिता संपल्यानंतर अंमलबजावणीला गती देण्याचे नियोजन;

; करमाळा प्रतिनिधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षणाची समान संधी मिळावी आणि जिल्हा परिषद शाळांमधील…

4 days ago