Categories: Uncategorized

केत्तुरला पुणे-मुंबई एक्स्प्रेसचा थांबा द्या! उपसभापती ॲड. अजिनाथ विघ्ने यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

करमाळा : प्रतिनिधी
केत्तुर रेल्वे स्थानकावर पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा, अशी मागणी करमाळा पंचायत समितीचे उपसभापती ॲड. अजिनाथ विघ्ने यांनी केली आहे. यासंदर्भात नवीन प्रस्तावासह विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे निवेदन सादर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
केत्तुर रेल्वे स्थानकावरून पुणे-मुंबईकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. विशेषतः सकाळच्या सत्रात विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक आणि सर्वसामान्य प्रवाशांची वर्दळ असते. मात्र, एक्स्प्रेस गाड्यांना थांबा नसल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. गेल्या अनेक वर्षांपासून या स्थानकावर एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी होत आहे.
सध्या सोलापूर आणि लातूरकडे जाणाऱ्या गाड्यांना थांबा मिळाल्याने प्रवाशांची गैरसोय काही प्रमाणात दूर झाली आहे. हरंगुळ व कलबुर्गी गाड्यांसह पॅसेंजर गाड्यांमधील प्रवाशांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक्स्प्रेसचा थांबा आवश्यक असल्याचे ॲड. विघ्ने यांनी नमूद केले.
मुंबई-हैदराबाद (२२७३२/२२७३१) किंवा चेन्नई-मुंबई (२२१५९/२२१६०) यांपैकी योग्य एक्स्प्रेसला केत्तुर येथे थांबा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या मागणीला मान्यता मिळाल्यास केत्तुरसह परिसरातील गावांमधील प्रवाशांचा वेळ आणि प्रवासाचा खर्च वाचण्यास मदत होणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची गरज लक्षात घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा ॲड. अजिनाथ विघ्ने यांनी व्यक्त केली.

saptahikpawanputra

Recent Posts

राष्ट्रीय पत्रकार संरक्षण परिषदेच्या राष्ट्रीय सचिव पदी संजय मस्कर यांची निवड

    करमाळा प्रतिनिधी- राष्ट्रीय पत्रकार संरक्षण परिषदेच्या राष्ट्रीय सचिव पदी साडे (ता. करमाळा, जि.…

16 hours ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य केल्याबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांनी केले देवाभाऊंचे अभिनंदन

  करमाळा प्रतिनिधी - संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती…

23 hours ago

करमाळा पोलिसांची मोठी कारवाई; ट्रॅक्टर चोरीची बीड-चिखलठाण टोळी जेरबंद तीन ट्रॅक्टर व ट्रॉलीसह ९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त; चार गुन्ह्यांची उकल

करमाळा (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या शेतातून उभे ट्रॅक्टर चोरून नेणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा करमाळा पोलिसांनी पर्दाफाश केला…

2 days ago

खुनशी राजकीय प्रवृत्तीमुळे दहिगाव उपसा सिंचन योजनेची वाताहत! २४ गावांपैकी १२ गावांनाही व्यवस्थित पाणी मिळाले नाही- भरत (भाऊ )आवताडे

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेची विद्यमान आमदार नारायण…

2 days ago

पुणे शिक्षक मतदार संघ कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक संघटनांचा निर्धार मुकुंद साळुंखे सर यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराला वेग

करमाळा प्रतिनिधी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षक संघटना, टीडीएफ आणि भारतीय जनता…

4 days ago

जिल्हा परिषद शाळांत पहिलीपासून सेमी इंग्रजीसाठी दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत शिक्षण विभागाची आढावा बैठक आचारसंहिता संपल्यानंतर अंमलबजावणीला गती देण्याचे नियोजन;

; करमाळा प्रतिनिधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षणाची समान संधी मिळावी आणि जिल्हा परिषद शाळांमधील…

5 days ago