जाधव-पाटील हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. रोहन पाटील यांच्या पुढाकाराने व आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर राबवण्यात आले. शिबिरादरम्यान हॉस्पिटलमधील डॉक्टर, परिचारिका व सर्व संबंधित कर्मचारी यांनी अत्यंत शिस्तबद्ध व सेवाभावी वृत्तीने काम करून रुग्णांना उत्तम दर्जाची आरोग्यसेवा दिली.या यशस्वी उपक्रमाबाबत बोलताना डॉ. रोहन पाटील यांनी सांगितले की, “करमाळा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात तज्ज्ञ डॉक्टरांचे उपचार मिळावेत, या उद्देशाने जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये भविष्यातही विविध आजारांवर आधारित आरोग्य शिबिरे नियमितपणे आयोजित करण्याचा आमचा मानस आहे.”शिबिर यशस्वी होण्यासाठी संस्थेचे सचिव श्री. अभिजित पाटील, डॉ. शिवानी पाटील, श्री. अजिंक्य पाटील, श्री. तात्यासाहेब जाधव, श्री. महादेव भोसले, श्री. प्रमोद जगदाळे, श्री. राहुल जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले.
करमाळा प्रतिनिधी : करमाळा येथील श्री कमला भवानी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाच्या सातव्या माळेनिमित्त हजारो…
करमाळा प्रतिनिधी स्त्री ही जगाची जननी असून, ती श्रीदेवीच्या रूपाने संपूर्ण सृष्टीचे पालन-पोषण करणारी माता…
करमाळा : प्रतिनिधी केत्तुर रेल्वे स्थानकावर पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा, अशी मागणी करमाळा…
करमाळा प्रतिनिधी- राष्ट्रीय पत्रकार संरक्षण परिषदेच्या राष्ट्रीय सचिव पदी साडे (ता. करमाळा, जि.…
करमाळा प्रतिनिधी - संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती…
करमाळा (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या शेतातून उभे ट्रॅक्टर चोरून नेणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा करमाळा पोलिसांनी पर्दाफाश केला…