ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी यश संपादन करावे, या उद्देशाने प्रा. डॉ. महेश निकत सातत्याने कार्यरत आहेत. ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून त्यांनी करमाळा व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रगतीच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या या शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
शिर्डी येथील साई पालखी निवारा, साईबाबा मंदिर परिसरात पार पडलेल्या या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. विशाल शेडे, सहाय्यक धर्मादाय आयुक्त, अहिल्यानगर उपस्थित होते.
यावेळी मा. श्री. अरुण भांडोरे (सेवानिवृत्त), कार्याध्यक्ष, त्रिदल सैनिक संघ, नाशिक व कार्याध्यक्ष, सैनिक फेडरेशन, नाशिक; मा. श्री. बाबासाहेब कापे, संचालक, विश्वरूप इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड; मा. श्री. निलेशजी घोडेचोर, मॅनेजर, पंजाब नॅशनल बँक; तसेच मा. निवेदिता पगार, अभिनेत्री, मॉडेल व उद्योजिका आणि मिसेस इंडिया २०२१ विजेत्या, यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रा. डॉ. महेश निकत यांच्या कार्याचा हा सन्मान असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.या पुरस्कारामुळे ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, करमाळा तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी ही अभिमानास्पद बाब ठरली आहे. प्रा. डॉ. महेश निकत यांच्यावर शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.ग्रामीण शिक्षणाच्या उन्नतीसाठी समर्पित भावनेने केलेल्या कार्याला मिळालेला हा सन्मान भविष्यातील शैक्षणिक वाटचालीस नवी प्रेरणा देणारा ठरणार आहे.
करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…
करमाळा : प्रतिनिधी शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आणि शिक्षकांच्या हक्कांचा आवाज विधान परिषदेत बुलंद करण्यासाठी…
करमाळा प्रतिनिधी.... करमाळ्याच्या श्री हनुमंत भांडवलकर व सौ राधा हनुमंत भांडवलकर यांची तीन नंबरची कन्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा येथील श्री कमला भवानी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाच्या सातव्या माळेनिमित्त हजारो…
करमाळा प्रतिनिधी स्त्री ही जगाची जननी असून, ती श्रीदेवीच्या रूपाने संपूर्ण सृष्टीचे पालन-पोषण करणारी माता…