Categories: Uncategorized

उजनीवरील चार प्रकल्पांविरोधात शेतकरी-मच्छीमार एकवटले; ३१ ऑक्टोबरला रास्ता रोको! नघोर्ली येथे संजयमामा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; जनसुनावणी घेण्याची मागणी

 

करमाळा प्रतिनिधी 
उजनी धरणावर प्रस्तावित तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प, एआय डेटा सेंटर आणि लघु मॉड्युलर अणुभट्टी या चार प्रकल्पांसाठी तब्बल १ लाख ६५ हजार कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. या प्रकल्पांच्या संभाव्य परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी नघोर्ली येथे माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या फार्महाऊसवर त्यांच्या अध्यक्षतेखाली करमाळा, माढा व इंदापूर तालुक्यांतील शेतकरी आणि मच्छीमार बांधवांची बैठक पार पडली.

विकासाला विरोध नाही; मात्र शेतकरी-मच्छीमारांच्या हिताकडे दुर्लक्ष नको! प्रकल्पांचे फायदे, पाण्याची गरज आणि शेती, मत्स्यव्यवसाय व पर्यावरणावरील संभाव्य परिणाम शासनाने स्पष्ट करावेत. जनतेला विश्वासात घेऊन जनसुनावणी घ्यावी, अशी भूमिका उपस्थित मान्यवरांनी मांडली.

बैठकीच्या व्यासपीठावर माजी आमदार संजयमामा शिंदे, बारामती ॲग्रोचे व्हाईस चेअरमन सुभाष गुळवे, करमाळा पंचायत समितीचे उपसभापती ॲड. अजित विघ्ने, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भरत अवताडे, राजेंद्र धांडे, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील, चंद्रकांत सरडे, रोहिदास सातव, तानाजी झोळ, गौरव झांजुर्णे, सुजित बागल, सुभाष अभंग, अशपाक जमादार, मानसिंग खंडागळे, उदयसिंह देशमुख, सचिन गावडे, सोमनाथ रोकडे, ॲड. जालिंदर बसळे, नानासाहेब लोकरे, उमेश इंगळे, नितीन खटके आणि रवींद्र वळेकर उपस्थित होते.यावेळी ॲड. अजित विघ्ने, ताटे सर, संदीप माने, सौरभ आरकिले, अविनाश सरडे, निलेश देवकर, अक्षय यादव, नंदकुमार नगरे, सीताराम नगरे, सुभाष आबा गुळवे आणि माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी मनोगते व्यक्त केली.या प्रकल्पांविरोधात जनजागृती करण्यासाठी ३१ ऑक्टोबर रोजी रांजणी येथील महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून, करमाळा, माढा व इंदापूर तालुक्यांतील शेतकरी आणि मच्छीमार बांधवांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उपस्थित मार्गदर्शकांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विकास वीर यांनी केले.उजनीचे पाणी, शेतकऱ्यांचे भविष्य आणि मच्छीमारांची उपजीविका सुरक्षित ठेवण्यासाठी एकजुटीने लोकशाही मार्गाने आवाज उठवण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

11 hours ago

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…

23 hours ago

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कौस्तुभ गावडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा शिक्षक नेते मुकुंद साळुंखे यांचे आवाहन; सोलापूर जिल्ह्यातून मोठे मताधिक्य मिळण्याचा विश्वास

करमाळा : प्रतिनिधी शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आणि शिक्षकांच्या हक्कांचा आवाज विधान परिषदेत बुलंद करण्यासाठी…

4 days ago

जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर ऋतुजा भांडवलकरची परदेशात भरारी; संघर्षातून यशाचा प्रेरणादायी प्रवास!”……

करमाळा प्रतिनिधी.... करमाळ्याच्या श्री हनुमंत भांडवलकर व सौ राधा हनुमंत भांडवलकर यांची तीन नंबरची कन्या…

7 days ago

जाधव-पाटील हाॅस्पिटल करमाळा येथे आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने 18 व्या मुळव्याध शिबिराची यशस्वी सांगता जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये नाममात्र दरात उपचार; 115 रुग्णांचा सहभाग

  करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था…

1 week ago

श्री कमला भवानी मंदिरात सातव्या माळेला भाविकांची अलोट गर्दी; ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला!

  करमाळा प्रतिनिधी : करमाळा येथील श्री कमला भवानी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाच्या सातव्या माळेनिमित्त हजारो…

1 week ago