Categories: Uncategorized

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब नरारे यांना शास्त्रीय संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल पुरी (ओडिशा) येथे प्रतिष्ठेच्या ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरी येथील सुकुमारी कला केंद्राच्या वतीने आयोजित संगीत व नृत्य महोत्सवात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरीचे माजी आमदार जयंत कुमार सारंगी, नृत्यगुरू गोविंद चंद्र पाल, गुरू आशिष दास आणि गुरू श्रीमती मिनाती प्रधान यांच्या हस्ते श्री. नरारे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या महोत्सवात देशातील विविध राज्यांमधून आलेल्या संगीत व नृत्य क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या निवडक कलाकारांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. विविध कलाप्रकारांच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि कलापरंपरेचे दर्शन या महोत्सवात घडले.
महोत्सवामध्ये भारतातून आलेल्या कलाकारांनी शास्त्रीय गायनासह ओडिसी, कथक, सत्रिय, मोहिनीअट्टम, रवींद्र नृत्य, झुमर आदी विविध नृत्यशैलींचे बहारदार सादरीकरण करण्यात आले.
शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने कार्यरत असलेल्या प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना राष्ट्रीय स्तरावरील महोत्सवात मिळालेला हा सन्मान करमाळा शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरला आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

18 hours ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

6 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

1 week ago