Categories: Uncategorized

यशवंत शिंदे यांची नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी! ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकमाढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

करमाळा प्रतिनिधी 
निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा शिंदे यांनी नेमबाजी क्रीडा प्रकारात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. पुणे शूटिंग स्पोर्ट्स असोसिएशन आणि महाराष्ट्र रायफल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा २०२६ (शॉटगन) या स्पर्धेत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.
सदर स्पर्धा दि. ३० ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून श्री. यशवंत शिंदे यांनी आपल्या नेमबाजी कौशल्याची आणि क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेची चुणूक दाखवून दिली आहे.
या स्पर्धेतील त्यांची सर्वात उल्लेखनीय कामगिरी म्हणजे त्यांनी आतापर्यंतचा सर्वाधिक गुणांचा विक्रम मोडीत काढत १२५ पैकी तब्बल ११२ गुण मिळवले. या विक्रमी कामगिरीमुळे त्यांनी रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव नोंदवले असून, सुवर्णपदकावरही आपली मोहोर उमटवली आहे. राज्यस्तरावर अशी ऐतिहासिक कामगिरी करणारे श्री. यशवंत शिंदे हे निमगाव ( टें) सह माढा तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरले आहेत.
या स्पर्धेतील पारितोषिक वितरण समारंभ मुंबई उपनगर जिल्हा रायफल असोसिएशनचे अध्यक्ष श्री. अशोक पंडित, उपाध्यक्ष श्री. रमेश कुसळे आणि जनरल सेक्रेटरी श्रीमती शीला कानुंनगो व तेजस्विनी सावंत यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यांच्या हस्ते सुवर्णपदक विजेते श्री. यशवंत शिंदे यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.
श्री. यशवंत शिंदे हे करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री. संजयमामा विठ्ठलराव शिंदे यांचे सुपुत्र आहेत. राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रात कार्यरत असतानाच क्रीडा क्षेत्रातही त्यांनी मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे.
त्यांच्या या यशामुळे निमगाव (टें.), माढा तालुका तसेच संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून पुढील क्रीडा वाटचालीसाठी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
निमगावच्या मातीतून राज्यस्तरावर सुवर्णझेप! सुवर्णपदकासह विक्रमाची नोंद करणाऱ्या श्री. यशवंत शिंदे यांच्या या देदीप्यमान यशाने तरुणांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

6 hours ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

24 hours ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

6 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago