Categories: Uncategorized

गोमातेच्या पूजनातून गोसेवेचा संदेश; गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्थेत वसुबारस उत्साहात साजरी

करमाळा  प्रतिनिधी
भारतीय संस्कृतीत गोमातेला अत्यंत पवित्र आणि पूजनीय स्थान असून, गोसेवा ही श्रद्धा, संस्कार आणि सेवाभावाचे प्रतीक मानली जाते. याच परंपरेचे जतन करत गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्थेच्या वतीने गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी वसुबारसचा सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी गोमातेचे विधिवत पूजन करून तिला पारंपरिक खाद्यपदार्थांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. संस्थेचे पदाधिकारी, गोसेवा समितीचे सदस्य, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि गोसेवकांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष श्रेणिक शेठ खाटेर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्थेच्या कार्याची माहिती देत गोमातेचे संगोपन, संरक्षण आणि संवर्धन करण्याचे महत्त्व विशद केले. गोसेवा ही केवळ धार्मिक परंपरा नसून ती समाजाप्रती असलेली सेवाभावाची भावना आहे. गोमातेची सेवा आणि तिचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान द्यावे, असे विचार त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी माने भाऊसाहेब यांनी गोपालन संस्थेला शुभेच्छा देत संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. संस्थेचे जगदीशजी सिकची यांनीही आपले मनोगत व्यक्त करून गोसेवेचे महत्त्व अधोरेखित केले.
वसुबारसच्या निमित्ताने गोमातेला बाजरीची भाकरी, राळ्याचा भात, गवारीची भाजी आणि गूळ असा पारंपरिक नैवेद्य दाखविण्यात आला. उपस्थित सर्व मान्यवरांनी गोमातेचे विधिवत पूजन केले. गोपालन समितीच्या सदस्यांनी गोमातेला चारा घालून तिची सेवा केली. या धार्मिक विधीमुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
या कार्यक्रमातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे गेल्या वीस वर्षांपासून गोमातेची निष्ठेने सेवा करणारे पोपटराव काळदाते व त्यांचा परिवार यांचा सहभाग. त्यांनी अनेक वर्षांपासून सातत्याने गोसेवेचे व्रत जपले असून, त्यांच्या सेवाभावातून समाजासमोर एक आदर्श निर्माण झाला आहे.
या कार्यक्रमाला गोसेवा समितीचे प्रकाश मुनोत, अनिल सोळंकी, चंद्रकांतजी कटारिया, आशिष बोरा, दिनेश मुथा, बँक इन्स्पेक्टर शंकरजी रासकर साहेब, अक्षय मंडलेचा, अजिंक्य गुगळे, शुभम कटारिया, आयुष कटारिया, विठ्ठल भणगे, वैभव दोशी, वर्धमान खाटेर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच श्रावक संघाचे माजी अध्यक्ष चंद्रकांतजी कटारिया हे आपल्या परिवारासह कार्यक्रमात सहभागी झाले होते. गोपालन संस्थेचे सर्व सदस्य आणि गोसेवा समितीच्या सदस्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.
वसुबारसच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून गोमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच गोसेवा, गोसंवर्धन आणि भारतीय संस्कृतीतील पारंपरिक मूल्यांचे जतन करण्याचा संदेश देण्यात आला. धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्रेणिक शेठ खाटेर यांनी उपस्थित सर्व मान्यवर, गोसेवा समितीचे पदाधिकारी, सदस्य आणि गोसेवकांचे आभार मानले. तसेच सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

saptahikpawanputra

Recent Posts

यशवंत शिंदे यांची नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी! ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकमाढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

करमाळा प्रतिनिधी  निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…

2 days ago

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

2 days ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

3 days ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

1 week ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

2 weeks ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

2 weeks ago