हा उपक्रम वीट जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सौ. अश्विनी गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात येणार आहे. शिक्षकांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव करणे, शाळांमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण करणे आणि ग्रामीण शिक्षणाचा दर्जा उंचावणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी १०० गुणांची प्रश्नावली तयार करण्यात आली असून, त्रिस्तरीय तज्ज्ञ समितीमार्फत शिक्षकांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन केले जाणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, शाळेची उपस्थिती व पटनोंदणी, लोकसहभागातून शाळा विकास, शिष्यवृत्ती परीक्षांमधील यश, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम, डिजिटल शिक्षण, नाविन्यपूर्ण अध्यापन आणि सामाजिक योगदान अशा विविध निकषांचा समावेश आहे.
या पुरस्कारासाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक १ लाख रुपये, द्वितीय क्रमांकाचे ५० हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाचे २५ हजार रुपये अशी एकूण १ लाख ७५ हजार रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, ही सर्व बक्षिसे भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे हे स्वतःच्या खर्चातून देणार आहेत. ग्रामीण भागातील शिक्षकांच्या उत्कृष्ट कार्याला प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या कामाचा सन्मान व्हावा आणि जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षकांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने त्यांनी ही संकल्पना राबवली आहे,
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ व २०२६-२७ या दोन वर्षांतील कामगिरीच्या आधारे मूल्यमापन करण्यात येणार आहे. वीट जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. ‘शिक्षकांचा सन्मान, शाळांचा विकास आणि विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य’ या ध्येयातून सुरू करण्यात आलेला गणेश चिवटे यांचा हा उपक्रम ग्रामीण शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणारा ठरणार आहे.
करमाळा प्रतिनिधी भारतीय संस्कृतीत गोमातेला अत्यंत पवित्र आणि पूजनीय स्थान असून, गोसेवा ही श्रद्धा, संस्कार…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…
करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…