Categories: Uncategorized

जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत कृषी साहित्य खरेदीसाठी ५० टक्के किंवा मर्यादित अनुदान; शेतकऱ्यांनी मुदतीत प्रस्ताव सादर करावेत – दिग्विजय बागल

 

करमाळा प्रतिनिधी 

पंचायत समिती करमाळा कृषी विभागामार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कृषी साहित्य खरेदीसाठी ५० टक्के किंवा मर्यादित अनुदान उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भाजप नेते दिग्विजय बागल यांनी केले आहे.

या योजनेंतर्गत कडबाकुट्टी, ५ एचपी व ७.५ एचपी विद्युत ओपनवेल सबमर्सिबल पंप संच (पाणबुडी मोटार), ५/६ एचपी डिझेल इंजिन, रोटाव्हेटर, पल्टी नांगर, पेरणी यंत्र, पिस्टन स्प्रे पंप, नॅपसॅक बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप, ताडपत्री आणि स्लरी फिल्टर या कृषी साहित्यांसाठी अनुदानाचे प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

इच्छुक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले परिपूर्ण प्रस्ताव २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पंचायत समिती, करमाळा येथील आवक-जावक विभागात सादर करावेत. अपूर्ण प्रस्ताव स्वीकारले जाणार नसल्याने शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनच प्रस्ताव दाखल करावेत.

शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा, उत्पादन खर्च कमी व्हावा आणि शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ मिळावा, या उद्देशाने अशा योजनांचा लाभ घेणे आवश्यक आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन दिग्विजय बागल यांनी केले आहे.

कोट
एआय आधारित कृषी किटचाही अनुदान योजनेत समावेश करण्यासाठी जिल्हा परिषदेकडे मागणी करणार – दिग्विजय बागल

“शेतकऱ्यांना पारंपरिक कृषी साहित्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत एआय आधारित कृषी किटचाही समावेश करून ते अनुदानावर उपलब्ध करून द्यावेत, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडे मागणी करणार आहे. स्मार्ट सेन्सर, स्वयंचलित सिंचन प्रणाली आणि एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पाणी, खते व उत्पादन खर्चात बचत होण्यास मदत होईल. आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ अल्पभूधारक आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांनाही मिळावा, हा यामागील उद्देश आहे.”

— दिग्विजय बागल, भाजप नेते

saptahikpawanputra

Recent Posts

उजनीच्या जलाशयातील महिलेच्या खुनाचे गूढ उकलले ब्लँकेटमध्ये गुंडाळून मृतदेह पाण्यात फेकला; आठ जिल्ह्यांत शोधमोहीम राबवत करमाळा पोलिसांची दोन दिवसांत धडाकेबाज कामगिरी

करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयात ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळलेल्या अनोळखी महिलेच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात करमाळा पोलिसांना…

2 hours ago

भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांचा स्तुत्य उपक्रम! जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी आदर्श शिक्षक पुरस्कार

  करमाळा (प्रतिनिधी) :- ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावून त्या उत्कृष्ट व…

1 day ago

गोमातेच्या पूजनातून गोसेवेचा संदेश; गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्थेत वसुबारस उत्साहात साजरी

करमाळा  प्रतिनिधी भारतीय संस्कृतीत गोमातेला अत्यंत पवित्र आणि पूजनीय स्थान असून, गोसेवा ही श्रद्धा, संस्कार…

4 days ago

यशवंत शिंदे यांची नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी! ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकमाढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

करमाळा प्रतिनिधी  निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…

5 days ago

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

5 days ago