मराठी साहित्याच्या माध्यमातून सामाजिक समरसता, वैचारिक संवाद आणि साहित्यिक अभिव्यक्तीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने समरसता साहित्य परिषद कार्यरत आहे. सोलापूर जिल्ह्यात साहित्य चळवळीचा विस्तार करण्याबरोबरच महिला, युवक आणि नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कार्यकारिणीत विविध आयामांचा समावेश करण्यात आला आहे. नूतन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी दिनेश मडके (करमाळा), सुधाकर कवडे (पंढरपूर) कार्यवाहपदी दत्तात्रय इंगळे (सोलापूर), तर सहकार्यवाहपदी प्रा. नरेंद्र गुंडेली (सोलापूर) यांची निवड करण्यात आली आहे. महिला आयाम प्रमुखपदी डॉ. दुर्गा जोशी, सहप्रमुखपदी अमृता कल्याणी, कार्यवाहपदी अक्षता केळकर आणि सहकार्यवाहपदी सविता पाटील यांची निवड करण्यात आली आहे. महिला साहित्यिकांच्या सहभागाला चालना देण्याच्या दृष्टीने या आयामाची रचना करण्यात आली आहे. युवती आयाम प्रमुखपदी ऐश्वर्या धडके, सहप्रमुखपदी प्रिया कुलकर्णी व श्रद्धा रोडगे, कार्यवाहपदी रूपा कुताटे, तर सहकार्यवाहपदी इशिता साठे, प्राजक्ता आसबे आणि गौरी उल्लयंगल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवा आयाम प्रमुखपदी आनंद धडके आणि सहप्रमुखपदी समर्थ चौगुले यांची निवड झाली आहे.
……………………..
*साहित्यिक उपक्रमांसाठी स्वतंत्र आयामांची निर्मिती*
सांस्कृतिक आयाम प्रमुखपदी प्रा. डॉ. धन्यकुमार बिराजदार, कार्यक्रम नियोजन आयाम प्रमुखपदी प्रा. पुरुषोत्तम बगले, सहप्रमुखपदी मदन जवळगेकर, प्रकाशन व प्रकाशक आयाम प्रमुखपदी यशवंत बिराजदार, प्रसिद्धी आयाम प्रमुखपदी पिंटू विभुते, ग्रंथालय आयाम प्रमुखपदी गुरुनाथ गोविंदे आणि सहप्रमुखपदी नागराज बगले यांची निवड करण्यात आली आहे. तालुकास्तरावरही परिषदेचा विस्तार करण्यात आला असून, मोहोळ तालुका प्रमुखपदी विजया देशपांडे, अक्कलकोट तालुका प्रमुखपदी रेखा सोनकवडे, पंढरपूर तालुका प्रमुखपदी शुभांगी दहिवाळ आणि बार्शी तालुका प्रमुखपदी अशोक मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यकारिणी सदस्य सीमा भंडारी, प्रा. शिवराज पाटील, प्रा. संतोष पवार, विजयकुमार सोनवणे, जयश्री आडकी, रेखा मेलगे-मगर, प्रा. अनुराधा विभुते, प्रतीक्षा शिंदे, सविता पाटील, डॉ. राजश्री जाधव, श्वेता वाळवेकर, अबोली थोरात, नीलावती कचरे-खरात, रेखा दंदे-गडेकर आणि जगन्नाथ हुक्केरी यांचा समावेश करण्यात आला आहे.
……………………….
*ज्येष्ठ साहित्यिकांच्या अनुभवाला नव्या पिढीची साथ*
समरसता साहित्य परिषदेच्या सोलापूर शाखेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. माधव कुलकर्णी यांची पुनर्निवड करण्यात आली आहे, तर संस्कृत साहित्याच्या अभ्यासक, विचारवंत डॉ. दुर्गा जोशी यांच्याकडे महिला आयामाची जबाबदारी देण्यात आली आहे. महिला, युवती, युवा, सांस्कृतिक, प्रकाशन, प्रसिद्धी आणि ग्रंथालय अशा विविध आयामांच्या माध्यमातून जिल्ह्यातील साहित्यिकांना संघटनात्मक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. नव्या कार्यकारिणीत अनुभवी साहित्यिकांसह नव्या पिढीला स्थान देण्यात आले आहे.
करमाळा (प्रतिनिधी) : करमाळा शहरातील दिव्यरत्न सिटी येथे चॅम्पियन क्लब हाऊसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी शुक्रवार, दि. १३ नोव्हेंबर २०२६…
करमाळा प्रतिनिधी दुष्काळाच्या झळा केवळ माणसांनाच सोसाव्या लागत नाहीत, तर जंगलातील मुके वन्यजीवही पाण्याच्या थेंबासाठी…
करमाळा प्रतिनिधी : दीपावली पाडव्याच्या पावन निमित्ताने करमाळा येथील श्री कमलाभवानी मंदिरात छत्रपती शिवाजी…
करमाळा प्रतिनिधी : प्रतिकूल परिस्थिती, संघर्ष आणि अनेक अडचणींवर मात करत जिद्द, चिकाटी व कठोर…
करमाळा प्रतिनिधी पंचायत समिती करमाळा कृषी विभागामार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषद…