Categories: Uncategorized

मांगी तलावात कुकडीचे आवर्तन सोडा भाजप नेते दिग्विजय बागल यांची पालकमंत्र्यांकडे मागणी तसेच पाणीटंचाई निवारणासाठी दहिगाव उपसा सिंचन योजनेतून झरे, म्हसेवाडी तलावात पाणी सोडण्याचीही मागणी;

करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने तालुक्यातील सर्व मध्यम प्रकल्प व तलावांमध्ये अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापासूनच ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. माणसांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असल्याने कुकडी कालव्याद्वारे मांगी तलावात तातडीने पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडावे, तसेच दहिगाव उपसा सिंचन योजनेतून झरे व म्हसेवाडी तलावात प्राधान्याने पाणी सोडावे, अशी मागणी भाजपचे जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे केली.
याबाबत माहिती देताना दिग्विजय बागल म्हणाले की, यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिल्याने करमाळा तालुक्यातील जलस्रोत कोरडे पडले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता दहिगाव उपसा सिंचन योजनेतून झरे व म्हसेवाडी तलावात प्राधान्याने पाणी सोडणे आवश्यक आहे.
कुकडी कालव्याद्वारे मांगी तलावात पाणी सोडल्यास मांगी तलावावर अवलंबून असलेल्या बोरगावसह परिसरातील बारा गावांचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच मांगी तलावाचे भौगोलिक स्थान महत्त्वाचे असून करमाळा, कर्जत व जामखेड या लगतच्या तालुक्यांमध्ये टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी हा तलाव टँकर भरण्याचा महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरू शकतो. त्यामुळे मांगी तलावात पिण्याच्या पाण्यासाठी तातडीने आवर्तन सोडण्याची आवश्यकता आहे. मांगी तलावाचा पिण्याच्या पाण्यासाठीच्या विशेष आवर्तनात समावेश असल्याने या मागणीचा प्राधान्याने विचार करावा, असेही बागल यांनी निवेदनात नमूद केले.
याशिवाय करमाळा शहराच्या पाणीपुरवठा योजनेतील सुधारणा कामांसाठी विशेष निधी म्हणून ४० लाख रुपये मंजूर करण्याची मागणीही त्यांनी केली. या मागणीची दखल घेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना यासंदर्भात तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती दिग्विजय बागल यांनी दिली.
तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाई, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची गरज आणि करमाळा शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील सुधारणा या तिन्ही महत्त्वाच्या प्रश्नांवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे मांगी तलावात कुकडीचे आवर्तन, झरे व म्हसेवाडी तलावात दहिगाव योजनेचे पाणी आणि शहराच्या पाणीपुरवठा सुधारणेसाठी निधी उपलब्ध होण्याबाबत आशा निर्माण झाली असल्याचे दिग्विजय बागल यांनी सांगितले.

saptahikpawanputra

Recent Posts

बीजमाता पद्मश्री राहीबाईंच्या विचारांचा जागर; जिव्हाळा स्नेहमेळाव्यात वीस समाजरत्नांचा गौरव.

करमाळा प्रतिनिधी : मातीच्या कुशीत जपलेले बीज उद्याची सृष्टी घडवते, तर समाजात रुजलेला सेवाभाव भावी…

13 hours ago

दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनासाठी संजयमामा शिंदे ॲक्शन मोडवर! पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन आवर्तन एक महिना अगोदर सुरू करण्याची मागणी

  करमाळा प्रतिनिधी : दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी आमदार संजयमामा…

3 days ago