Categories: Uncategorized

एस. यु. राजे भोसले हायस्कूल जिंतीच्या १९८०-८५ बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात चार दशकांनंतर गुरु-शिष्य एकत्र शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत माजी विद्यार्थ्यांचा भावनिक स्नेहसोहळा संप्पन

 

जिंती (प्रतिनिधी) : शालेय जीवनातील आठवणी आणि गुरुजनांनी दिलेले संस्कार आयुष्यभर विसरता येत नाहीत. याच आठवणींना उजाळा देण्यासाठी एस. यु. राजे भोसले हायस्कूल, जिंती येथील इयत्ता पाचवी ते दहावीच्या १९८० ते १९८५ या बॅचमधील माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. तब्बल चार दशकांनंतर शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. गुरु-शिष्यांच्या नात्यातील जिव्हाळा आणि मैत्रीचा स्नेहबंध या निमित्ताने पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला.
या स्नेहसंमेलनासाठी तत्कालीन शिक्षक श्री. अशोक ढवळे सर, श्री. रणदिवे सर उपस्थित होते. तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री. भांडवलकर, श्री. रामहरी तरटे आणि श्री. दादासाहेब जगताप यांनी उपस्थिती लावली. एस. यु. राजे भोसले हायस्कूल तसेच जिंती हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. सुजीत झांजुर्णे सर माजी शिक्षक श्री वेताळ भगत सर यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे निवेदन श्री. रामहरी झांजुर्णे सर यांनी केले.
अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. वर्गातील गमतीजमती, शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन, मित्रांसोबतचे खेळ, शाळेतील शिस्त आणि शिक्षकांनी दिलेले संस्कार यांची आठवण काढताना अनेक विद्यार्थी भावूक झाले. आयुष्याच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करताना शाळेने दिलेले शिक्षण आणि गुरुजनांचे मार्गदर्शन किती मोलाचे ठरले, याची जाणीव यावेळी सर्वांनी व्यक्त केली.
चार दशकांचा कालावधी लोटला असला तरी जुन्या मित्रांमधील प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा आजही कायम असल्याचे या स्नेहमेळाव्यातून दिसून आले. जुन्या मित्रांच्या भेटीने हास्यविनोद, आठवणी आणि भावनिक क्षणांची मैफल रंगली. शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनातील यशस्वी वाटचालीत गुरुजनांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.सदर स्नेहसंमेलन कार्यक्रम १६ नोव्हेंबर रोजी एस.यु . राजेभोसले हायस्कूल जिंती ता.करमाळा येथील प्रांगणात पार पडला.
या स्नेहमेळाव्यास रविंद्र बारवकर, संजय राऊत, रामभाऊ हाके, भरत मुंगळे, सारंग माहेरा, मनोहर साळुंखे, किसन गायकवाड, मल्हारी वारगड, दादा शेजाळ, अशोक वारगड, गंगाराम वाघमोडे, महारुद्र पाटील, पांडुरंग हाके, रमेश पानसरे, दादा गुळवे, राजू माळवदकर, राजू धारक, अनिल घोरपडे, भागुजी कावळे, आण्णा मोरे, रमेश धेंडे, योगिराज देवकाते, गयाजी हाके, बाळासाहेब गिरंजे, रावसाहेब वारगड, ज्ञानेश्वर शिंदे, दत्तात्रेय आचपळे, बाळासाहेब काटे, बाळासाहेब रणदिवे, चिमाजी देमुंडे, मच्छिंद्र धेंडे, मालन धेंडे, वनिता जाधव, सिंधू गिरंजे, बेबी कदम, शारदा मुटके, शोभा हाके आणि मुक्ता पाहुणे यांच्यासह माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
काळ बदलला, पिढ्या बदलल्या, प्रत्येकजण आपापल्या संसारात आणि कार्यक्षेत्रात रमला; मात्र शाळेतील मैत्री आणि गुरुजनांविषयीचा आदर कायम राहिला. जुन्या आठवणींना उजाळा देणारा हा स्नेहमेळावा सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला आहे

saptahikpawanputra

Recent Posts

बीजमाता पद्मश्री राहीबाईंच्या विचारांचा जागर; जिव्हाळा स्नेहमेळाव्यात वीस समाजरत्नांचा गौरव.

करमाळा प्रतिनिधी : मातीच्या कुशीत जपलेले बीज उद्याची सृष्टी घडवते, तर समाजात रुजलेला सेवाभाव भावी…

13 hours ago

दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनासाठी संजयमामा शिंदे ॲक्शन मोडवर! पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन आवर्तन एक महिना अगोदर सुरू करण्याची मागणी

  करमाळा प्रतिनिधी : दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी आमदार संजयमामा…

3 days ago