Categories: Uncategorized

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा येथील श्री कमलाभवानी देवीच्या मंदिरात दर्शन घेऊन स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ

करमाळा (प्रतिनिधी): सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा येथील श्री कमलाभवानी देवीच्या मंदिरात दर्शन घेऊन स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

प्रसंगी माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी उमेदवार डॉ.अनिकेत देशमुख, संग्रामसिंह जहागीरदार , शिवाजी पाटील, सिंधू सुरेश पाटील , अस्मिता गायकवाड , ॲड. दत्तात्रय खडतरे यांचेसह श्री कमलाभवानी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शेतकरी, सभासद आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना ‘शिट्टी’ या चिन्हावर मतदान करून विजयी करावे, असे आवाहन माजी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ सवितादेवी राजेभोसले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, शहाजीराव देशमुख, डॉ.वसंतराव पुंडे, उदयसिंह मोरे पाटील, महेंद्र पाटील, देवानंद बागल, ॲड.बाळासाहेब पाटील, ॲड.लुणावत, ॲड.सविता शिंदे, प्रवीण कटारिया, दशरथ कांबळे, संतोष खाटमोडे पाटील, अमरजित साळुंके, डॉ.अमोल घाडगे, संतोष वारे, दत्तात्रय देशमुख, अभयसिंह राजेभोसले, आबासाहेब टापरे, डॉ.अमोल दुरुंदे, निलेश झोळ, ॲड.प्रशांत बागल, ज्ञानेश्वर लोकरे, महेश पाटील, ज्ञानेश्वर पवार, गणेश कांबळे, शिवाजी जाधव, मुस्तकीम पठाण, ऋषिकेश सिकची यांचेसह करमाळा तालुक्यातील मान्यवर पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते व मतदार बहुसंख्येने उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी तात्यासाहेब जाधव यांची बिनविरोध निवड व्हा. चेअरमनपदी निशांत खारगे, तर सचिवपदी अजित कणसे यांची निवड

  करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री. तात्यासाहेब जाधव यांची, तर…

7 hours ago

चार हजार ऊसदरासाठी शेतकऱ्यांचा महामार्गावर एल्गार राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली कुंभेज फाट्यावर रास्ता रोको; नऊ मागण्यांसाठी शासनाला इशारा

करमाळा  प्रतिनिधी उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर मिळावा, यासह शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या नऊ…

1 day ago

सिव्हिल इंजिनिअर शैलेश खडके यांना मातृ शोक श्रीमती अंजली मधुकर खडके यांचे दुःखद निधन

करमाळा  प्रतिनिधी करमाळा येथील शिवाजीनगरमधील रहिवासी तथा सिव्हिल इंजिनिअर प्रसिद्ध क्राॅन्ट्रक्टर श्री. शैलेश मधुकर खडके…

2 days ago

ग्लोबल डिफेन्स अकॅडमीचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न!

  करमाळा प्रतिनिधी  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोलीस, सैन्यदल, एनडीए व अग्निवीर यांसारख्या संरक्षण आणि शासकीय…

3 days ago