Categories: Uncategorized

करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी तात्यासाहेब जाधव यांची बिनविरोध निवड व्हा. चेअरमनपदी निशांत खारगे, तर सचिवपदी अजित कणसे यांची निवड

 

करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री. तात्यासाहेब जाधव यांची, तर व्हाइस चेअरमनपदी श्री. निशांत खारगे आणि सचिवपदी श्री. अजित कणसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.ही निवड सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विष्णू माने यांच्या अध्यक्षतेखाली सहाय्यक निबंधक कार्यालयात पार पडली. या निवडीमुळे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.यावेळी संस्थेचे संचालक प्रताप काळे, आदिनाथ देवकते, अरुण चौगुले, साईनाथ देवकर, सतीश चिंदे, वैशाली महाजन व पूनम जाधव उपस्थित होते.तसेच प्रविण घाडगे, अमोल राऊत, उमेश कानडे, बाळासाहेब वाघमोडे, लक्ष्मण भंडारे, दयानंद चौधरी, देवेंद्र जाधवर, मारुती ढेरे, संभाजी गोसावी, नितीन व्हटकर, विनोद वारे, चंद्रकांत जाधवर, दादासाहेब बुधवंत, सुधीर चव्हाण, अशोक कणसे, अशोक दुधे, बाळासाहेब दुधे व रमेश नामदे आदी मान्यवर उपस्थित होते.नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची प्रगती होऊन सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जातील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

saptahikpawanputra

Recent Posts

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा येथील श्री कमलाभवानी देवीच्या मंदिरात दर्शन घेऊन स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ

करमाळा (प्रतिनिधी): सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा येथील श्री कमलाभवानी देवीच्या मंदिरात…

17 hours ago

चार हजार ऊसदरासाठी शेतकऱ्यांचा महामार्गावर एल्गार राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली कुंभेज फाट्यावर रास्ता रोको; नऊ मागण्यांसाठी शासनाला इशारा

करमाळा  प्रतिनिधी उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर मिळावा, यासह शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या नऊ…

1 day ago

सिव्हिल इंजिनिअर शैलेश खडके यांना मातृ शोक श्रीमती अंजली मधुकर खडके यांचे दुःखद निधन

करमाळा  प्रतिनिधी करमाळा येथील शिवाजीनगरमधील रहिवासी तथा सिव्हिल इंजिनिअर प्रसिद्ध क्राॅन्ट्रक्टर श्री. शैलेश मधुकर खडके…

2 days ago

ग्लोबल डिफेन्स अकॅडमीचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न!

  करमाळा प्रतिनिधी  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोलीस, सैन्यदल, एनडीए व अग्निवीर यांसारख्या संरक्षण आणि शासकीय…

3 days ago