करमाळा उपजिल्हा रुग्णालय व जेऊर ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजन लाईन चे काम तात्काळ होणार – आ.संजयमामा शिंदे.

करमाळा प्रतिनिधी
कोरोना आजारामुळे ऑक्सिजन बेडचा तुटवडा करमाळा मतदारसंघात जाणवत असल्याकारणाने रुग्णांचे हाल होत होते. या पार्श्‍वभूमीवर तालुक्यातील करमाळा उपजिल्हा रुग्णालय आणि जेऊर ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी ऑक्सीजन बेड ची सुविधा उपलब्ध व्हावी असी मागणी आ. संजयमामा शिंदे यांनी जिल्हाधिकारी तसेच आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे साहेब यांच्याकडे केली होती. या मागणीला यश आलेले असून आजपासून या रुग्णालयात ऑक्सीजन लाईन टाकण्याचे काम तात्काळ सुरू होत आहे.
सोलापूर जिल्ह्यासह करमाळा तालुक्यात कोरोना आजाराने थैमान घातलेले असताना ऑक्सिजन अभावी रुग्णांची हेळसांड होत होती. ही हेळसांड थांबविण्यासाठी मतदार संघातच ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी ऑक्सिजन लाईनचे काम होणे गरजेचे होते ते काम आज सुरू होत आहे. असी माहिती आमदार संजय मामा शिंदे यांनी दिली.

saptahikpawanputra

Recent Posts

स्त्री ही जगाची जननी; नवरात्रोत्सव म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर सौ. स्वातीताई फंड यांचे प्रतिपादन; जिजाऊ ग्रुपच्या दांडिया महोत्सवाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

करमाळा प्रतिनिधी स्त्री ही जगाची जननी असून, ती श्रीदेवीच्या रूपाने संपूर्ण सृष्टीचे पालन-पोषण करणारी माता…

24 mins ago

केत्तुरला पुणे-मुंबई एक्स्प्रेसचा थांबा द्या! उपसभापती ॲड. अजिनाथ विघ्ने यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

करमाळा : प्रतिनिधी केत्तुर रेल्वे स्थानकावर पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा, अशी मागणी करमाळा…

23 hours ago

राष्ट्रीय पत्रकार संरक्षण परिषदेच्या राष्ट्रीय सचिव पदी संजय मस्कर यांची निवड

    करमाळा प्रतिनिधी- राष्ट्रीय पत्रकार संरक्षण परिषदेच्या राष्ट्रीय सचिव पदी साडे (ता. करमाळा, जि.…

2 days ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य केल्याबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांनी केले देवाभाऊंचे अभिनंदन

  करमाळा प्रतिनिधी - संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती…

2 days ago

करमाळा पोलिसांची मोठी कारवाई; ट्रॅक्टर चोरीची बीड-चिखलठाण टोळी जेरबंद तीन ट्रॅक्टर व ट्रॉलीसह ९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त; चार गुन्ह्यांची उकल

करमाळा (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या शेतातून उभे ट्रॅक्टर चोरून नेणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा करमाळा पोलिसांनी पर्दाफाश केला…

3 days ago

खुनशी राजकीय प्रवृत्तीमुळे दहिगाव उपसा सिंचन योजनेची वाताहत! २४ गावांपैकी १२ गावांनाही व्यवस्थित पाणी मिळाले नाही- भरत (भाऊ )आवताडे

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेची विद्यमान आमदार नारायण…

3 days ago