Categories: Uncategorized

पत्रकारांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी १९ लाखांची मदत प्रतिबिंब प्रतिष्ठानचा पुढाकार अध्यक्ष राजा माने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्यवृत्ती योजनेची राज्यभर अंमलबजावणी खा.उदयनराजे भोसले यांच्या हस्ते शनिवारी धनादेश वितरण

सातारा : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील डिजिटल मीडियामध्ये कार्यरत असलेल्या गरजू पत्रकारांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यविषयक गरजांसाठी प्रतिबिंब प्रतिष्ठान, मुंबईच्या वतीने तब्बल १९ लाख रुपयांची आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. नामदार चंद्रकांतदादा पाटील पत्रकार पाल्य शिष्यवृत्ती योजनेंतर्गत राज्यातील ६२ पत्रकारांच्या कुटुंबांना या मदतीचा लाभ मिळणार आहे. या मदतीचे धनादेश शनिवार, दि. २८ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सातारा येथील जलमंदिर पॅलेस येथे श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या शुभहस्ते वितरित करण्यात येणार आहेत.
पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि विविध सामाजिक घटकांच्या समस्या शासन व प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार करीत असतात. बदलत्या काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले असून, या माध्यमातून अनेक पत्रकार सामाजिक बांधिलकी जपत जनतेचे प्रश्न मांडत आहेत. मात्र, मर्यादित आर्थिक उत्पन्नात पत्रकारितेचे कार्य करताना स्वतःच्या कुटुंबाच्या शैक्षणिक आणि आरोग्यविषयक जबाबदाऱ्या पार पाडताना अनेक पत्रकारांना अडचणींचा सामना करावा लागतो.
ही परिस्थिती लक्षात घेऊन गरजू पत्रकारांच्या पाल्यांचे शिक्षण आर्थिक अडचणींमुळे थांबू नये, तसेच कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यविषयक गरजांच्या वेळी आर्थिक मदत मिळावी, या सामाजिक उद्देशाने प्रतिबिंब प्रतिष्ठानने नामदार चंद्रकांतदादा पाटील पत्रकार पाल्य शिष्यवृत्ती योजना राबविली आहे.
प्रतिबिंब प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संस्थापक ज्येष्ठ पत्रकार मा. राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेची महाराष्ट्रभर यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये डिजिटल मीडियामध्ये कार्यरत असलेल्या गरजू पत्रकारांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यातून ६२ पत्रकारांच्या कुटुंबांना एकूण १९ लाख रुपयांचे आर्थिक पाठबळ उपलब्ध झाले आहे.
पत्रकार समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रश्नांसाठी आवाज उठवत असतो; मात्र त्याच्या स्वतःच्या कुटुंबाच्या शिक्षण आणि आरोग्यविषयक अडचणी अनेकदा दुर्लक्षित राहतात. अशा वेळी सामाजिक संस्थांनी पत्रकारांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. प्रतिबिंब प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे पत्रकारांच्या पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन मिळण्याबरोबरच कुटुंबीयांनाही आर्थिक दिलासा मिळणार आहे.
सातारा येथे होणाऱ्या धनादेश वितरण समारंभास खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्यांच्या शुभहस्ते लाभार्थी पत्रकारांना धनादेश प्रदान करण्यात येणार आहेत. यावेळी भाजपचे सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक काका धुमाळ, जिल्हा समन्वय व संयोजन समितीचे सदस्य विनीत पाटील, सातारा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. दत्ता बनकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष अमोल पाटील, नियोजन सभापती अशोक शेडगे, नगरसेवक पंकज खडाव, नगरसेविका शिल्पाताई श्रीमंत कदमकर, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश भाऊ सावंत, राज्य महासचिव विकास भोसले आणि राष्ट्रीय सचिव तेजस राजपूत यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून सातारा जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे आहेत. पत्रकारांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे करणारा प्रतिबिंब प्रतिष्ठानचा हा उपक्रम राज्यातील डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण करणारा ठरत आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

उजनीत एआय डेटा सेंटर नकोच; काँग्रेसचा घंटानाद! साहेबराव वाघमारे यांचा सरकारला इशारा; तहसील कार्यालयासमोर आंदोलन

  करमाळा (प्रतिनिधी) : उजनी धरण परिसरात प्रस्तावित एआय डेटा सेंटर प्रकल्पाला स्थानिक शेतकरी, शेतमजूर,…

7 hours ago

भारतीय जनता पार्टीच्या ग्रामविकास व पंचायत राज प्रकोष्टच्या सोलापूर(प) च्या जिल्हा संयोजक पदी अमोल पवार यांची निवड

करमाळा प्रतिनिधी- महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीच्या ग्रामविकास व पंचायत राज…

16 hours ago

करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा माध्यमिक शिक्षक संघटना टिडीएफच्यावतीने शिक्षक नेते पुणे विभागीय उपाध्यक्ष मुकुंद साळुंखे सर यांच्या हस्ते सत्कार*

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी तात्यासाहेब जाधव, व्हाईस चेअरमनपदी निशांत खारगे…

1 day ago

सोलापूर जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल शंभूराजे जगताप यांचा टीडीएफतर्फे गौरव टीडीएफचे पुणे विभागीय उपाध्यक्ष मुकुंद साळुंखे सर यांच्या हस्ते सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शंभूराजे जयवंतराव जगताप यांची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी…

2 days ago

सांगोल्यातील डॉ.धनाजी जगताप व डॉ.सारिका जगताप यांच्या गोदावरी हॉस्पिटलमध्ये लहान मुलांवर मोफत शस्त्रक्रिया व मोफत औषध उपचार

सांगोला प्रतिनिधी सांगोला शहरातील प्रसिद्ध असलेल्या डॉ. धनाजी जगताप व डॉ. सारिका जगताप यांच्या हॉटेल…

3 days ago