करमाळा तालुक्यातील अंजनडोह येथील कुस्तीपटू आश्लेषा कल्याण बागडे हिची दक्षिण आफ्रिकेतील पोलोक्वाने येथे ४ ते ६ डिसेंबर २०२६ दरम्यान होणाऱ्या कॉमनवेल्थ सिनिअर कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. ५९ किलो महिला कुस्ती वजनगटातून ती भारताचे प्रतिनिधित्व करणार असून, तिच्या या आंतरराष्ट्रीय यशामुळे करमाळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आश्लेषाने कुस्ती क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. दिल्ली येथील छत्रसाल कुस्ती स्टेडियमवर झालेल्या निवड चाचणीत तिने आपल्या कौशल्याच्या जोरावर भारतीय संघातील स्थान निश्चित केले. यापूर्वी आशियाई कुस्ती स्पर्धेतही तिने देशाला पदक मिळवून दिले आहे. तिच्या या यशामागे वडील कल्याण बागडे यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभले आहे.
दक्षिण आफ्रिकेतील स्पर्धेसाठी विमान प्रवास, व्हिसा, आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाचे परवाना शुल्क तसेच निवास व भोजन यांसह एकूण अंदाजे २ लाख २८ हजार १५ रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ग्रामीण भागातील खेळाडूला आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली असताना आर्थिक अडचण तिच्या प्रवासात अडथळा ठरू नये, या भावनेतून माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी आश्लेषाला २५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली आहे.
ग्रामीण भागातील खेळाडूंनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर मजल मारावी, त्यांच्या पाठीशी समाजातील सर्व घटकांनी उभे राहावे, हीच या मदतीमागची भावना असल्याचे संजय मामा शिंदे यांनी सांगितले यावेळी मुलीचे पालक कल्याण बागडे यांचा सन्मान सुजित तात्या बागल यांच्या हस्ते करण्यात आला.
आश्लेषाच्या या निवडीमुळे अंजनडोह, राजुरी तसेच संपूर्ण करमाळा तालुक्यात आनंदाचे वातावरण असून, दक्षिण आफ्रिकेत ती भारताचा तिरंगा अभिमानाने उंचावेल आणि देशासाठी पदक जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
करमाळा प्रतिनिधी : करमाळा नगरपरिषद क्षेत्रातील थकीत मालमत्ता कर वसुलीला गती देण्यासाठी शासनाच्या प्रोत्साहनात्मक अभय…
करमाळा प्रतिनिधी पत्रकारांच्या पाल्यांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा हात देत महाराष्ट्र राज्याचे उच्च व…
करमाळा (प्रतिनिधी) : उजनी धरण परिसरात प्रस्तावित एआय डेटा सेंटर प्रकल्पाला स्थानिक शेतकरी, शेतमजूर,…
सातारा : प्रतिनिधी महाराष्ट्रातील डिजिटल मीडियामध्ये कार्यरत असलेल्या गरजू पत्रकारांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी आणि कुटुंबातील सदस्यांच्या…
करमाळा प्रतिनिधी- महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीच्या ग्रामविकास व पंचायत राज…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी तात्यासाहेब जाधव, व्हाईस चेअरमनपदी निशांत खारगे…