Categories: Uncategorized

पत्रकार नंदकिशोर वलटे यांना सर्पदंश; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला संवाद, केली प्रकृतीची विचारपूस मदतीसाठी तत्पर असल्याचा दिला विश्वास; काळजी घेण्याचे केले आवाहन

करमाळा प्रतिनिधी: करमाळा तालुक्यातील उमरड येथील शेतकरी व पत्रकार नंदकिशोर वलटे यांना बुधवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ऊसाच्या शेतात काम करत असताना सर्पदंश झाला. त्यांच्यावर सध्या करमाळा येथील जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः दूरध्वनीद्वारे संपर्क साधून विचारपूस केली.
मुंबई मंत्रालयात कामानिमित्त गेले असताना प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष संदिप तळेकर यांच्या माध्यमातून नंदकिशोर वलटे यांना सर्पदंश झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली. ही माहिती मिळताच त्यांनी तत्काळ वलटे यांच्याशी संवाद साधत उपचारांची माहिती घेतली व प्रकृतीची काळजी घेण्यास सांगितले.
यावेळी काही वैद्यकीय किंवा आर्थिक मदतीची आवश्यकता भासल्यास संपर्क साधावा, आवश्यक ती मदत करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, असा विश्वासही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.
शेती व्यवसायासोबतच पत्रकारितेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रश्न मांडणाऱ्या नंदकिशोर वलटे यांची राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः दूरध्वनी करून विचारपूस केल्याने उमरड परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

गुरुनानक जयंतीनिमित्त करमाळ्यात रक्तदान व अन्नदानाचा सेवाभावी उपक्रम सिंधी समाजाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर; भजन, प्रवचन आणि महाप्रसादाने भक्तिमय वातावरण

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथे गुरुनानक जयंतीनिमित्त सिंधी समाजाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आणि अन्नदानाचा सेवाभावी…

19 hours ago

करमाळा नगरपरिषद थकीत मालमत्ता करावरील दंडात ५० टक्के सवलत – नगराध्यक्षा मोहिनी सावंत

करमाळा प्रतिनिधी : करमाळा नगरपरिषद क्षेत्रातील थकीत मालमत्ता कर वसुलीला गती देण्यासाठी शासनाच्या प्रोत्साहनात्मक अभय…

2 days ago

उजनीत एआय डेटा सेंटर नकोच; काँग्रेसचा घंटानाद! साहेबराव वाघमारे यांचा सरकारला इशारा; तहसील कार्यालयासमोर आंदोलन

  करमाळा (प्रतिनिधी) : उजनी धरण परिसरात प्रस्तावित एआय डेटा सेंटर प्रकल्पाला स्थानिक शेतकरी, शेतमजूर,…

4 days ago