३१ डिसेंबरपर्यंत कर्जवसुलीसाठी तगादा लावु नये मनसे शहराध्यक्ष नानासाहेब मोरे यांची मागणी.

करमाळा प्रतिनिधी केंद्र व राज्य सरकारने संपूर्ण भारतात लाॅकडाऊन जाहीर केल्या मुळे सर्व सामान्य नागरिक,शेतमजूर, हातावर पोट भरणारी जनता, मजूरांची उपासमार होत असल्याचे गेल्या सहामहिन्यांपासून दिसत आहे. आता कुठे तरी अनलाॅकमुळे हळूहळू परिस्थिती बदलत आहे.त्यातच आता शासनाच्या व सहकारी बँका, फायनान्स, पतसंस्था, सध्या असलेल्या महिला बचत गटांकडे वसुली करीत आहेत. ही वसुली.  ३१ डिसेंबर पर्यंत करण्यात येऊ नये अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष नानासाहेब मोरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे ईमेल द्वारे केली आहे.यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे  मागील काळात लाॅकडाऊन असल्यामुळे अनेक मजूरांचा रोजगार बुडाला आहे तर उद्योग धंदे ठप्प झाले अनेक खाजगी कामगाराला कामा वरून कमी करण्यात आले तर महीला बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांचे छोटे मोठे स्वयं रोजगार सुध्दा मोडकळीस आले आहेत, आता हळूहळू परिस्थिती पूर्व पदावर येत असताना महिला बचत गटाला विविध बँका,फायनान्स,पतसंस्थाचे वसुली अधिकारी घरी जाऊन महिलांना धमकी देताना पहायला मिळत आहे.तसेच फायनान्स कंपनी खाजगी व्यक्ती कडून वसुली करून घेतात व त्यांना टक्केवारी नुसार पैसे दिले जातात. त्यामुळे जास्त टक्केवारी मिळविण्याच्या नादात ही मंडळी साम-दाम-दंड भेद वापरून कर्ज वसुली करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाने कमीत कमी आता ३१ डिसेंबर पर्यंत कुठलीही कर्जदाराकडे वसुली करू नये वसुली साठी तगादा लावु नये, तसेच जबरदस्ती करून दंड व्याज लावू नये अन्यथा बँका, फायनान्स, पतसंस्थांच्या ऑफिसला टाळे ठोकल्याशिवाय राहणार नाही.याबाबत माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी लक्ष घालून या बाबतीत निर्णय घ्यावा असे या वेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.सदर निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी सोलापूर व तहसीलदार करमाळा पोलीस निरीक्षक करमाळा यांना देण्यात आले.
यावेळी मनसे करमाळा शहर अध्यक्ष नानासाहेब मोरे, तालुका अध्यक्ष संजय घोलप, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र मोरे,  मनसे विद्यार्थी सेना जिल्हा संपर्क अध्यक्ष विजय रोकडे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष सतिश फंड,  जिल्हा उपाध्यक्ष आनंद मोरे आदी उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी तात्यासाहेब जाधव यांची बिनविरोध निवड व्हा. चेअरमनपदी निशांत खारगे, तर सचिवपदी अजित कणसे यांची निवड

  करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री. तात्यासाहेब जाधव यांची, तर…

10 hours ago

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा येथील श्री कमलाभवानी देवीच्या मंदिरात दर्शन घेऊन स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ

करमाळा (प्रतिनिधी): सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा येथील श्री कमलाभवानी देवीच्या मंदिरात…

20 hours ago

चार हजार ऊसदरासाठी शेतकऱ्यांचा महामार्गावर एल्गार राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली कुंभेज फाट्यावर रास्ता रोको; नऊ मागण्यांसाठी शासनाला इशारा

करमाळा  प्रतिनिधी उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर मिळावा, यासह शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या नऊ…

1 day ago

सिव्हिल इंजिनिअर शैलेश खडके यांना मातृ शोक श्रीमती अंजली मधुकर खडके यांचे दुःखद निधन

करमाळा  प्रतिनिधी करमाळा येथील शिवाजीनगरमधील रहिवासी तथा सिव्हिल इंजिनिअर प्रसिद्ध क्राॅन्ट्रक्टर श्री. शैलेश मधुकर खडके…

2 days ago

ग्लोबल डिफेन्स अकॅडमीचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न!

  करमाळा प्रतिनिधी  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोलीस, सैन्यदल, एनडीए व अग्निवीर यांसारख्या संरक्षण आणि शासकीय…

3 days ago