सकल मराठा  समाज करमाळा यांच्यावतीने आरक्षणासाठी करमाळा बंद ‌यशस्वी विविध मागण्याचे निवेदन

 करमाळा प्रतिनिधी   सकल मराठा समाज यांच्यावतीने आरक्षणासाठी सोलापूर जिल्हा बंद असून करमाळा शहर व तालुक्यातील सर्व दुकानदार छोटे-मोठे व्यापारी व्यावसायिक व्यापारी व यांना केलेल्या करमाळा बंदच्या  आवाहनाला भरभरून प्रतिसाद म्हणून आज करमाळा शहरात कडकडीत शंभर टक्के बंद पाळण्यात आला. यावेळी सकल मराठा समाज करमाळा यांच्यावतीने  मराठा समाजाला आरक्षण विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार समीर माने, पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांना देण्यात आले.  करमाळा शहरातील व्यापारी तसेच छोटे मोठे व्यावसायिक यांनी ही आपली दुकाने बंद ठेवुन मराठा समाजाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या स्थगिती उठवली जावी तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकार पर्यंत मराठा समाजाच्या भावना पोहचवण्यासाठी करमाळा शहर व तालुका बंदची हाक सकल मराठा समाज करमाळा यांचे वतीने देण्यात आली होती.
यावेळी बंद दरम्यान सकाळी १० वाजता ,छत्रपती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी मानाचा मुजरा करून मराठा समाजातील बांधवांनी एकत्र येऊन आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. या बंदला  शहरातील विविध सामाजिक, राजकीय व्यक्ती तसेच संघटनांनी पाठिंबा दिला होता. यामध्ये करमाळयाचे आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार नारायणराव पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्र्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नागेश कांबळे ,शेतकरी, कामगार संघर्ष समितीचे दशरथराव कांबळे, करमाळा मुस्लिम समाज संघटनेचे अध्यक्ष हाजी उस्मानशेठ तांबोळी, बहुजन मुक्ती मोर्चा, शिवसेना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पार्टी आदींनी पाठिंबा दिला होता.
     मराठा  समाजाच्या आरक्षणाची स्थगिती उठवली जावी तसेच समाजाच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार पर्यंत मराठा समाजाच्या भावना पोहचवण्यासाठी करमाळा शहर व तालुका बंदची हाक सकल मराठा समाज करमाळा यांचे वतीने देण्यात आली होती त्याला जनतेने व सर्वपक्षीय नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला असल्याने बंद शांततेत शिस्तबद्ध पद्धतीने शंभर टक्के यशस्वीपणे संप्पन झाला.

saptahikpawanputra

Recent Posts

यशवंत शिंदे यांची नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी! ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकमाढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

करमाळा प्रतिनिधी  निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…

8 hours ago

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

14 hours ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

1 day ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

6 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago