Categories: करमाळा

सामाजिक कार्यकर्ते श्रेणीक खाटेर यांचे वडील पन्नालाल खाटेर यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी ‌ करमाळा दत्तपेठ येथील व्यापारी व तपस्वीरत्न पुरस्काराने सन्मानीत झालेले पन्नालाल खाटेर (वय-89) यांचे वृध्दपकाळाने आज (ता.26) सकाळी सहा वाजता राहत्या घरी निधन झाले आहे. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, सहा मुली, सुन व नातवंडे असा परिवार आहे. गेल्या 40 वर्षापासून ते सतत नामचिंतनात व्यस्त होते तसेच एक दिवसाआड जेवणे, दोन दिवसाआड जेवणे, तीन दिवसाआड जेवणे. तीन दिवस पाणी न पिता जैन धर्माचे कडक उपवास करत होते.  त्यांच्या या तपाची दखल घेऊन जैन समाज संघटनेकडून त्यांना तपस्वीरत्न पुरस्काराने सन्मानीत केले होते. सामाजिक कार्यकर्ते  व व्यापारी श्रेणिकशेठ खाटेर यांचे ते वडील तर नगरसेविका संगीताताई खाटेर यांचे सासरे व ॲड.संकेत ,वर्धमान खाटेर यांचे आजोबा होते.  त्यांच्यावर दुपारी दोन वाजता दिव्यरत्न गोशाळेच्या जवळच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

23 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago