केत्तूर ( प्रतिनिधी) सचिन खराडे. सध्या महाराष्ट्रात राज्य कृषी सोडत पद्धतीने लाभार्थी शेतकऱ्यांची निवड केली जाते. ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे(नांगर,रोटाव्हेटर, कल्टयूटर आदी) ,बैल चलित यंत्र/अवजारे,मनुष्य चलित यंत्र/अवजारे, प्रक्रिया संच,काढणी पश्च्यात तंत्रज्ञान,फलोत्पादन यंत्र/अवजारे,वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे, स्वयं चलित यंत्रे आदी अवजारे या योजनेत समाविष्ट आहेत.
अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी हि योजना असून मागील तीन ते चार दिवसापासून या योजनेचे फॉर्म भरणारे सर्वर डाऊन आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना सीएससी केंद्रावर हेलपाटे मारून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी हे फॉर्म भरण्याची सुविधा नसल्याने १० ते १५ किमी अंतरावर हे फॉर्म भरण्यासाठी जावे लागत आहे. त्यातच अनेक शेतकऱ्यांचे आधार कार्डला मोबाईल लिंक नसल्याने बायोमेट्रिक साठी स्वतः खातेदार शेतकऱ्यांची उपस्थिती लागत असल्याने शेतकऱ्यांचा पैसे आणि वेळ विनाकारण खर्ची पडत आहे. अनेक वेळा हेलपाटे मारूनही सर्व्हर सतत डाउनच असल्याने या योजनेचे अनुदानाच नको अशी भावना शेतकऱ्यांची झाली आहे. हि तांत्रिक अडचण लवकरात लवकर दूर करून शेतकऱ्यांचे हेलपाटे बंद करावेत किंवा शेतकऱ्यांना विनाकारण आर्थिक भुर्दंड आणि नाहक त्रास देणाऱ्या योजना तरी बंद कराव्यात अशा कडवट प्रतिक्रिया शेतकऱ्यांडून सध्या उमटत आहेत. सुरवातीच्या मागील आठवड्यात फक्त १ ते २ दिवसातच हे सर्व्हर सुरळीत सुरु होते.सध्या सर्व्हर सतत डाऊन असल्याने अनेक शेतकरी हा फॉर्म भरण्यासाठी हेलपाटे मारत आहे.आणि सर्व्हर डाऊन आहे. म्हणताच शेतकरी शासनावर चिडून माघारी जात आहेत. सचिन खराडे – संचालक – आपले सरकार सेवा केंद्र केत्तूर सीएससी केंद्रावर माझे अनेक हेलपाटे झाले परंतु सर्व्हर डाऊन असल्याने माझा फॉर्म भरला गेला नाही. अनेक शेतकरी हेलपाटे मारत आहेत. सरकारने या योजनेच्या वेबसाईटची तांत्रिक अडचण लवकरात लवकर दूर करावी अन्यथा शेतकयांच्या रोषाला राज्य सरकारला सामोरे जावे लागेल दिलीप दंगाणे – शेतकरी (जिंती)
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…