करमाळा प्रतिनिधी. सोलापुर जिल्हा प्रशासन अधिकारी डॉ.पंकज जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिमेचा आढावा बैठक करमाळा नगरपरिषदेच्या सभागृहात पार पडली.या बैठकीत सर्व व्यापारी आपल्या दुकानाच्या प्रशेवद्वारावर मास्क नाही, तर दुकानात प्रवेश नाही, मास्क नाही तर सेवा नाही. No Mask No Service याबाबतचे स्टीकर, पोस्टर व बॅनर्स लावून स्वत:ही मास्क घालावा व गिऱ्हाईकांनाही घालण्यास बंधनकारक करावा याकरीता आवाहन केले आहे.
सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सर्व नगरपरिषद पदाधिकारी यांनी आपल्या वार्डात जास्तीत जास्त प्रमाणात जनजागृती करुन, प्राथमिक लक्षण दिसताच विलंब न करता कोरोना टेस्ट करुन घेण्यासाठी नागरिकांनी न घाबरता, अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या कुटूंबासाठी कोरोना चाचणी लवकरात लवकर करुन बरे व्हायचे आहे याकरीता लोकांमध्ये जनजागृती व वार्डवाईज कोरोना चाचणी करुन घेणे बाबत मार्गदर्शन केले.शहरातील प्रत्येक व्यापारी, प्रत्येक व्यापाऱ्यांकडील सर्व कर्मचारी, फेरीवाले, दुकानदार, कारखान्यातील मजूर हे सर्व जनसंपर्कात असल्यामुळे व प्राथमिक लक्षण दिसताच कोरोनाचाचणी करुन घ्यावी असे मार्गदर्शन केले.
माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित कराव्यात जनजागृती मोठया प्रमाणात करावी या सुचना दिल्या आहेत.करमाळा नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत राज्यात 22 व्या क्रमांकावर आहे व सध्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये सहभागी असल्याने प्लॅस्टिक मुक्त शहर, ओला सुका, घातक कचरा विलगीकरण, ओपनप्लॉट अस्वच्छता असल्यास दंडात्मक कारवाई व शहर हरीत व सुशोभिकरण करण्याचा कामाकडे लक्ष देण्याच्या सुचना जिल्हा प्रशासन अधिकारी डॉ.पंकज जावळे यांनी यांनी दिल्या.
यावेळी माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत स्वच्छता शपथ घेवून बैठकीची सांगता करण्यात आली.
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरात साकारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासह शिवस्मारकाच्या कामासाठी निधीची…
करमाळा प्रतिनिधी कै. डॉ. प्रदीपकुमार जाधव-पाटील यांच्या रुग्णसेवेचा वारसा पुढे नेत करमाळ्यात जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक…
* करमाळा प्रतिनिधी करमाळ्याचा राजा राशीनपेठ तरुण सेवा मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील विविध विकासकामांना गती देण्यासाठी तब्बल १० कोटी…
करमाळा प्रतिनिधी "वृत्तलेखन ही एक कला असून ते फक्त माहिती देणे एवढ्यापुरते मर्यादित राहिले नाही,…
करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…