करमाळा नगपरिषदेच्या वतीने माझे कुंटूब माझी जबाबदारी मोहिम अंतर्गत निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन

करमाळा प्रतिनिधी.                              .   महाराष्ट्र शासनाकडून कोवीड – 19 विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न म्हणून माझे कुंटूंब माझी जबाबदारी मोहिमेची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात सुरु आहे.या मोहिमे अंतर्गत नगरपरिषदेकडून शहरांमध्ये प्रत्येक कुंटूबाचे आरोग्य तपासणी सुरु आहे. कोरोनावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर, निर्जंतुकीकरणाचा वापर, या पलीकेडे जावून वैयक्तीक,कौटुंबिक तसेच सार्वजनिक आयुष्यात नवीन बदलाचा अवलंब करणे आवश्यक झाले आहे. अशा बदलांचा स्वीकार करुन नवीन जीवन शैली पध्दतीचा अवलंब करण्यास अधिकअधिक व्यक्तींना प्रेरित करुन प्रभावी आरोग्य शिक्षण व जनजागृती करण्यासाठी मा.वैभवराजे जगातप, नगराध्यक्ष करमाळा नगरपरिषद यांचे प्रेरणेतून व मार्गदर्शनानुसार नगरपरिषदेकडून कोरोना विरुध्द जनजागृतीपर निबंध व व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन दि.30/09/2020 रोजी केले आहे.
सदर स्पर्धेचा विषय 1)कोरोनावर मात करण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी, 2)कोरोना प्रतिबःध उपाय कोरोना झाल्यावर घेयची काळजी व कोरोना होऊन गैल्यावर घ्यायची कावजी, 3) मला समजलेला व मी आनुभवलेला कोरोना असा आहे. सदर वक्तृत्व व निंबध स्पर्धा नागरिक, शिक्षक, डॉक्टर या तीन गटांसाठी असून  प्रत्येक गटातून तीन क्रमांक काढण्यात येईल. सदर निबंध स्पर्धेसाठी शब्दमर्यादा जास्तीत जास्त अडीशे शब्द राहील. वक्तृत्व स्पर्धेसाठी कालमर्यादा दहा मिनिट असेल. या करिता प्रथम क्रमांक 1000/- रु.बक्षिस,व्दितीय क्रमांक 700/- रु.बक्षिस, तृतीय क्रमांक 500/- रु. बक्षिस असे प्रत्येक स्पर्धेसाठी असेल. तरी सदर स्पर्धे मध्ये नागरिक, शिक्षक, डॉक्टर यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन कोरोना विरुध्दच्या जनजागृती लढ्यामध्ये योगदान द्यावे.
सदर स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी 1) श्रीमती स्वाती जाधव,मो.नं.7387908395, 2) कु.आश्विनी पाटील,मो.नं.7387908395, 3) श्री.तुषार टांकसाळे, मो.नं.9960236571, 4) श्री.गणेश शिंदे, मो.नं.83083630945 यांना संपर्क साधून दि.29/09/2020 पर्यंत नाव नोंदणी करुन घ्यावी. आयोजन केलेल्या स्पर्धेचे परिक्षण दि.30/09/2020 रोजी सकाळी 11.00 वाजता होईल याची नोंद घ्यावी.
कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादूर्भाव रोखण्यासाठी न.पा.च्या वतीने जनजागृतीकरिता आयोजित केलेल्या निबंध, रांगोळी व वक्तृत्व स्पर्धा यशस्वी करणेसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
– वैभवराजे जगताप,नगराध्यक्ष,करमाळा नगरपरिषद,करमाळा.

saptahikpawanputra

Share
Published by
saptahikpawanputra

Recent Posts

शिवस्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही : पालकमंत्री जयकुमार गोरे करमाळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या कामाचे भूमिपूजन; भव्य भगवा ध्वज उभारण्यासाठीही निधी देण्याची घोषणा

करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरात साकारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासह शिवस्मारकाच्या कामासाठी निधीची…

11 hours ago

कै. डॉ. प्रदीपकुमार जाधव-पाटील यांच्या रुग्णसेवेच्या वारशाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड करमाळ्यात अत्याधुनिक कॅथलॅब सुरू; पाटील कुटुंबीयांचा उपक्रम स्तुत्य : पालकमंत्री जयकुमार गोरे

करमाळा प्रतिनिधी कै. डॉ. प्रदीपकुमार जाधव-पाटील यांच्या रुग्णसेवेचा वारसा पुढे नेत करमाळ्यात जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक…

12 hours ago

गणेशोत्सवानिमित्त राशीनपेठ तरुण मंडळाचा अखंड हरिनाम सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण, प्रवचन, कीर्तन दिंडी सोहळा महाप्रसादाचे आयोजन

* करमाळा प्रतिनिधी करमाळ्याचा राजा राशीनपेठ तरुण सेवा मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह…

19 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

2 days ago