महाराष्ट्र राज्यातील इ.१२ वी नंतरच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र या पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी १५ गुणांची अट ही महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त खाजगी विनाअनुदानित शिक्षण संस्थांना जास्त होती.ही अट या वर्षीपासून १५ गुणांनी कमी करण्यात आली आहे,अशी माहिती असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंट ऑफ अन ऐडेड इन्स्टिट्यूट इन रूरल एरिया चे अध्यक्ष प्रा.रामदासजी झोळ यांनी दिली आहे.हा निर्णय मागील ६ वर्षपासून प्रलंबित होता व ही बाब या संघटनेने महाराष्ट्र शासनाच्या विचारात आणून देण्याचे काम केले आहे.याबाबतची प्रथम बैठक मुंबई या ठिकाणी दि.२४.६.२०२० रोजी भारत देशाचे माजी कृषिमंत्री व महाराष्ट्र राज्याचे जेष्ठ नेते मा.श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत उच्च व ता तंत्र शिक्षण मंत्री श्री.उदयजी सामंत,उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव श्री.सौरभ विजय,तंत्रशिक्षण संचलनालायचे संचालक डॉ.अभयजी वाघ सो,संघटनेचे अध्यक्ष प्रा.रामदास झोळ,संघटनेचे सभासद श्री.राजीव जी जगताप यांच्या उपस्थितीत पार पडली व या बैठकीमध्ये केलेल्या मागणीस तत्वतः मान्यता देण्यात आली परन्तु, परिपत्रक लवकर जाहीर न केल्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री मा.श्री.उदयजी सामंत व तंत्रशिक्षण संचालनालय यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला व या पाठपुराव्यामुळे परत एकदा व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठक घेण्यात आली.त्यानंतर खासदार मा.श्री.संभाजी राजे यांना भेटून पाठपुरावा करण्यात आला व शेवटी दि.९.१०.२०२० रोजी याबाबत महाराष्ट्र शासनाने या निर्णयाबाबत राजपत्र काढून संघटनेच्या मागणीला यश मिळाले. या सर्वाचे फलित म्हणून त्याचा फायदा महाराष्ट्र राज्यातील शेतकरी, कष्टकरी व गरजवंत विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.या निर्णयाचे पालकांनी,विद्यार्थ्यांनी,प्राचार्य व संस्थचालक यांनी स्वागत केले व मा.मंत्री उदयजी सामंत व तंत्रशिक्षणाचे संचालक डॉ.अभयजी वाघ यांचे आभार मानले