रोगानशेषानपहंसी तुष्टा रुष्टा तु कामान सकलानभीष्टान!
त्वामाश्रितानां न विपन्नराणां! त्वामासिता हयाश्रयता प्रयान्ती!!
अर्थात अखील विश्र्वातील मानवी आरोग्यावर आलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी शक्ती दे! जग कोरोना मुक्त होऊ दे ! अशी प्रार्थना वरील मंत्रातून भवानी मातेला आळवणी करत
करमाळा तालुक्यातील श्री देवीचामाळ येथील प्रसिद्ध कमलाभवानी मंदिरात यंदा कोरोना विषाणूच्या वाढत असलेल्या प्रादुर्भावामुळे भाविक भक्तांच्या अनुपस्थितीत तसेच मोजक्या पुजारी मानकरी व विश्र्वस्तांच्या उपस्थितीत विधिवत पारंपरिक नित्योपचार महापूजा करण्यात येत आहे, अशी माहिती मानकरी भाऊसाहेब फुलारी यांनी दिली आहे. कमलाभवानी मंदिर हे शक्ती पंचायतन म्हणून ओळखले जाते नवरात्रात रोज दोन वेळा या मंदिराभोवती असणा-या पंचदेवतांची आरती केली जाते, दरवर्षी नवरात्र सोहळ्याला नऊ दिवस संपूर्ण महाराष्ट्रातून अंदाजे पाच लाख भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात असे प्रतिपादन बापूराव पुजारी यांनी केले आहे.
बुधवारी पाचव्या माळेला भवानी मातेची सुवर्ण मुकुट बांधून व चंदन मळवट भाळी लावून आकर्षक पुष्पहार अर्पण करून महापूजा करण्यात आली. ही अलंकारभूषीत महापूजा जयदीप पुजारी यांनी मांडली. यावेळी भवानी मातेला चंदन मळवट भरण्यात आला तसेच भरजरी शालू व झेंडूची मंडवळी बांधून पुजा मांडण्यात आली. यावेळी बापूराव पुजारी, विजय पुजारी, दादासाहेब पुजारी, मधूकर सोरटे, दिपक सोरटे, संदिप पुजारी, महेश कवादे, नारायण सोरटे, अभिमान सोरटे,तुकाराम सोरटे, पुरोहित रविराज पुराणिक, रंगनाथ पुराणिक,सारंग पुराणिक, बालाजी पुराणिक मानकरी शिवशंकर फुलारी, बबन दिवटे, प्रमोद गायकवाड, राजेंद्र शिंदे, मनोज जामदार, शिलाबाई गोमे, रमेश माळी, गणेश पवार, ईश्वर पवार, पद्माकर सुर्यपुजारी मंदिर समितीचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे सुशिल राठोड व्यवस्थापक अशोक घाटे महादेव भोसले, भाऊसाहेब सोरटे, योगेश सोरटे, प्रकाश सोरटे, सचिन सोरटे, लक्ष्मण हवालदार हजर होते.