करमाळा प्रतिनिधी
श्री मकाई सहकारी साखर कारखाना शेतकरी सभासद कामगार यांच्या मालकीचा कारखाना असुन हित जपण्यासाठी व कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी करमाळा तालुक्यातील शेतकरी सभासदांनी या कारखान्याला ऊस घालून सहकार्य करावे असे आवाहन मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय प्रिन्स बागल यांनी व्यक्त केले. श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या 19 व्या गळीत हंगामाचा मोळी पूजन करुन प्रारंभ झाला. मकाई कारखान्याचे संस्थापक स्व.दिंगबरराव बागल मामा यांच्या पुतळ्याचे पूजन करून ज्येष्ठ संचालक ज्ञानदेव देवकर, व्हाईस चेअरमन बाळासाहेब पांढरे,विद्या विकास मंडळाचे सचिव ज्येष्ठ नेते विलासराव घुमरे यांच्या हस्ते मोळी पूजन करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल म्हणाले मागील पाच वर्ष अडचणीचा काळ होता .यंदा सर्व अडचणीवर मात करून कारखान्याला चांगले दिवस आले आहेत. निसर्गाने यंदाच्या वर्षी चांगली कृपा केली असून शेतकरी, सभासद, कर्मचारी यांनी यावेळी आम्हाला साथ दिल्यास कारखाना पुन्हा गतवैभव प्राप्त करून सर्वांचे जीवन सुखी संप्पन होणार आहे.देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब, शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, कृषी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे कारखान्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले असून महाविकास आघाडी सरकारच्या काळात श्री. मकाई सहकारी साखर कारखान्याचे एन.सी.डी.सीचे कर्ज प्रकरण मार्गी लागणार असुन शेतकरी सभासद कर्मचारी यांनी कुठल्याही शंका मनात न ठेवता कारखान्याच्या प्रगतीसाठी कार्यरत रहावे अडचणीचे वाईट दिवस आता संपले असुन येणारे दिवस व काळ नक्कीच चांगला असणार आहे. श्री मकाई हा सभासदांचे हित जोपसणारा कारखाना आहे. जिल्ह्यातील इतर कारखान्याच्या सोबतच त्यांच्या बरोबरीने आम्ही ऊसदर देण्यासाठी कटिबध्द राहणार आहे. या सोबतच कारखाना यावर्षी ठरवलेले 3.50 लाख टनाचे गाळप उदिष्ठ ही पूर्ण करणार आहे. करमाळा तालुक्यातील सर्व सभासदांने आपला ऊस मकाई कारखान्याला देऊन कारखानास सहकार्य करावे, आपला विश्वास जपण्याचे काम कारखाना नक्कीच करत आला आहे. वाहतूकदारासोबतच कामगारांचे देणी येत्या मार्च महिन्यात देण्याचे काम कारखाना करेल. या मोळी पूजनावेळी स्वागत मकाईचे संचालक संतोष देशमुख, सुत्रसंचालन भाग्येश्वर बरडे यांनी केले. यावेळी संचालक गोकुळ नलवडे, दत्ता गायकवाड, नंदकिशोर भोसले, बापू कदम, माजी तालुकाध्यक्ष सतीश नीळ, रामभाऊ हाके , गोकुळ नलवडे. काशिनाथ काकडे, मोहन खाटमोडे , भिमराव मेरगळ , कार्यकारी संचालक हरिश्चंद्र खाटमोडे कार्यालय अधीक्षक एल.ए.बनसोडे, यांच्यासह सर्व अधिकारी, कामगार, सभासद उपस्थित होते आभार हरिश्चंद्र खाटमोडे यांनी मानले . चौकट कोरोना महामारीच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय प्रिन्स बागल यांनी शेतकरी हित जपण्यासाठी मकाई सहकारी साखर चालु करण्यासाठी अविरत परिश्रम घेऊन कारखाना यशस्वीपणे सुरू केला याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष सतीश बापु नीळ व शेतकरी यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री मकाई कारखान्याचे सेवानिवृत्त चिफ इंजिनिअर भाऊसाहेब बरडे यांचे दुःखद निधन झाल्यामुळे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.