अखेर प्रा.रामदास झोळ सर यांच्या मागणीला यश, डिकसळ ते डिकसळ पुल रस्त्यासाठी दोन कोटी मंजुर – पालकमंञी दत्ताञय मामा भरणे यांची माहिती.

करमाळा प्रतिनिधी
प्रा.प्रविण अंबोधरे
डिकसळ ते डिकसळ पुल या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अंदाजे दोन कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे अशी माहिती आज सार्वजनिक बांधकाम, मृद, व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय सामान्य प्रशासन मंञी तसेच पालकमंत्री सोलापूर जिल्हा ना.दत्ताञय मामा भरणे यांनी आज दिली.
या मंजुरीमुळे दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामदासजी झोळ सर यांच्या मागणीला यश आले आहे.
प्रा. रामदास झोळ सर तसेच ग्रामपंचायत काञज, टाकळी, व कोंढार चिंचोली यांनी मा.मंञी महोदयांना या अगोदर पञ व्यवहार करुण या रस्त्याची मागणी केली होती तसेच श्री.अरुण आण्णा लाड यांच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ना.भरणेमामांशी बोलणे झाले होते त्यावेळी देखिल या पञाचे त्यांना स्मरण करुण दिले होते, तेव्हा भरणेमामांनी असे सांगितले होते की राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करुन लवकरात लवकर या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावु असे आश्र्वासन भरणेमामांनी दिले होते.
तसेच या पञाची प्रत करमाळा विधानसभेचे आमदार संजय मामा शिंदे यांना देण्यात आली होती तसेच भिगवण गटाचे जि.प.सदस्य हनुमंत नाना बंडगर व सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे जिल्हा व सार्वजनिक बांधकाम विभाग इंदापुर तालुका यांना या मागणीची प्रत देण्यात आली होती, जि.प.सदस्य हनुमंत नाना बंडगर यांना देखील वारंवार फोनवर पाठपुरवठा करुन या रस्त्याची दुरुस्तीची मागणी करत होतो असे प्रा.झोळ सरांनी सांगितले.
सदरचा रस्ता हा अत्यंत खराब झाला असुन या रस्त्याचा वापर भिगवण, बारामती, पुणे या ठिकाणी विविध गरजांसाठी केला जातो, शेतकरी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या रस्त्यानी दैनंदिन ये जा करताना खुप ञास सहन करावा लागत आहे म्हणुन या रस्त्याने लोकांची व शालेय विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड व ञास कमी व्हावा यासाठी आम्ही या रस्त्याचे काम अत्यंत जलदगतीने व्हावे अशी मागणी ना.दत्ताञय भरणे मामांकडे केली होती व आज रोजी या रस्त्यासाठी ना.भरणेमामंनी निधी मंजूर करुन आणल्याबद्दल रामदास झोळ सर यांनी आभार मानले आहेत.
saptahikpawanputra

Recent Posts

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

5 hours ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

2 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

2 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

2 days ago

निमगाव (ह )येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर अल्पदरात चष्म्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…

3 days ago