देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चिखलठाण ये्थील रक्तदान शिबीरात एकशे एक रक्तदान संप्पन्न – चंद्रकांत काका सरडे

करमाळा प्रतिनिधी

कोरोनाच्या पाश्वभुमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री.उद्धव ठाकरे साहेब व आरोग्यमंत्री मा.श्री.राजेश टोपे साहेब यांनी केलेल्या रक्तदानाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, देशाचे नेते, माजी केंद्रीय कृषीमंत्री,माजी मुख्यमंत्री,महाविकास आघाडीचे शिल्पकार पद्मविभुषण मा.ना.शरदचंद्र पवारसाहेब यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्ताने चिखलठाण गावचे सरपंच तालुक्याचे नेते चंद्रकांत काका सरडे यांनी सामाजिक उपक्रमांद्वारे वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प करून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात गावातील युवक शेतकरी ग्रामस्थ यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन एकशे एक रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे .या रक्तदान शिबीराचे उद्घघाटन चिखलठाण गावचे सरपंच मा.श्री. चंद्रकांत (काका)सरडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमास आप्पासाहेब सरडे,अमोल मराळ,गणेश कळसाईत,राजेंद्र कांबळे,सुनिल ठोंबरे,अरुण पवार,राहुल कांबळे,अक्षयकांबळे,सुनिलकुचेकर,समाधान कांबळे,तुषारसरडे,अविनाश(सोन्या)कांबळे,संतोष कवितके,सदाशिव लगस,गणेश हरिहर उपस्थित होते. चिखलठाण येथील ग्रामस्थ शेतकरी युवक यांनी देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केल्याबद्दल कार्यक्रमाचे आयोजक सरपंच मा.श्री. चंद्रकांत काका सरडे व तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेस करमाळा चि.अनिकेत राखुंडे यांनी आभार मानले आहे.

laksh

Recent Posts

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 hours ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

17 hours ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

19 hours ago

करमाळा पोलिसांचा दणका ट्रॅक्टर चोरीचा छडा; ३.७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वीट येथील शेतातून ट्रॅक्टर लंपास; तांत्रिक तपासातून दोघे ताब्यात

करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…

1 day ago

श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

  करगाळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षा…

3 days ago