राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या वतीने महिला सरपंचांचा गुणगौरव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी च्या वतीने शरद पवार साहेबांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त आज सकाळी ११ वाजता गुरुकुल प्रशाला, कोर्टि येथे उत्तुंग काम करणाऱ्या महिला सरपंच, गुणवंत शिक्षिका, कोव्हिड काळात उत्कृष्ट काम केलेल्या परिचारिका,अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांचा गुणगौरव करण्यात आला, यावेळी महिला सरपंच लता मारकड(उमरड),सविता भगवान तनपुरे(वरकटने),गायत्री महेशकुमार कुलकर्णी(मांजरगाव),मनीषा बाळासाहेब कावळे(रामवाडी) तसेच शिक्षिका ज्योती बोटकर, ज्योती शिंदे, गोसावी मॅडम, टेकाळे सिस्टर,अंगणवाडी सेविका अंजना मेढे, आशा वर्कर हसीना शेख यांचा गुणगौरव करून प्रशस्तीपत्र देण्यात आले.

यावेळी पवार साहेबांच्या महिला धोरणा विषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिलादेवी झांजुर्णे होत्या, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपाध्यक्षा तृप्ती ताई साखरे ,adv सविता शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष विजयमाला चवरे,शहराध्यक्ष राजश्री कांबळे,युवा नेते श्रीकांत साखरे युवा नेते गौरव झाजुर्णे,असपाक जमादार, बाळासाहेब कावळे, महेशकुमार कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट अशे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस करमाळा महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा नलिनी ताई जाधव यांनी केले, सरपंच मनीषा कावळे यांनी छान मनोगत व्यक्त केले महिलांविषयी असे कार्यक्रम ग्रामीण भागात राबवण्याची गरज आहे, साहेबांच्या वाढदिवसानिम्मित आमचा महिला सरपंचांचा सन्मान केला हे आमच्यासाठी खूप भूषणावह आहे.अनेक मान्यवरांनची मनोगते झाले त्यात तृप्ती साखरे यांनी महिलांना मिळालेले स्थानिक स्वराज्य संस्था यातील ५०टक्के आरक्षण, सैनिक दलात महिलांना प्रवेश,महिला पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम केलं तर त्या घराची, देशाची प्रगती होते, शक्ती कायदा, शरद पवार ग्रामसमृद्धी योजना अश्या अनेक पवार साहेबांच्या सामाजिक, राजकीय घडमोडींविषयी मनोगत व्यक्त केले .सूत्रसंचालन सचिन नवले यांनी केले.आभार विजयमाला चवरे यांनी केले.

saptahikpawanputra

Recent Posts

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

3 hours ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

16 hours ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

19 hours ago

करमाळा पोलिसांचा दणका ट्रॅक्टर चोरीचा छडा; ३.७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वीट येथील शेतातून ट्रॅक्टर लंपास; तांत्रिक तपासातून दोघे ताब्यात

करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…

24 hours ago

श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

  करगाळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षा…

3 days ago