वनविभागाची नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची कामगिरी कौतुकास्पद शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरतभाऊ आवताडे केले वनविभागाचे अभिनंदन

करमाळा प्रतिनिधी

नरभक्षक बिबट्याने करमाळा तालुक्यात धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण दहशतीचे वातावरण होते गेल्या दहा बारा दिवसांपासून अथक प्रयत्न करून वनखात्याला बिबट्याला जेरबंद ठार करण्यास. यश आले नसल्या बिबट्याला ठार करण्यास सर्वसामान्य जनतेला परवानगी द्यावी अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरतभाऊ आवताडे यांनी केली होती याची वनविभागाने तातडीने दखल घेऊन जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी करमाळा तालुक्यातील तिघां निष्पाप व्यक्तींचे बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात डाॅ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्या सहकार्याने वनविभागाला यश आले आहे.याबद्दल वनविभागाचे अधिकारी कर्मचारी पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळेसाहेब यांनी जनतेला धीर देऊन योग्य पध्दतीने सुचना केल्यामुळे वनविभागाचे मनोबल वाढवल्यामुळे बिबट्याला ठार मारण्याची कामगिरी यशस्वीपणे पार पडली आहे याबद्दल शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरतभाऊ आवताडे यांनी अभिनंदन केले आहे. शनिवारी सायंकाळी या बिबट्याला वांगी नं.४ (ता.करमाळा) येथील रांखुडे वस्तीवर पांडुरंग रांखुडे यांच्या केळीच्या बागेत गोळ्या घालून ठार करण्यात आले आहे.या बिबट्याला पकडण्यासाठी गेल्या दहा-बारा दिवसांपासून वनविभाग व करमाळा पोलीस यंत्रणेनेची शोध मोहिम सुरू होती. परंतु हा बिबट्या कोणाच्या हाती लागला नव्हता तसेच दोन दिवसांपासून गायब झालेला व कोणाच्याही दृष्टिक्षेपास न आलेला नरभक्षक बिबट्या आज अखेर वांगी ४ परिसरात दिसल्याने याभागातील नागरिकांमध्ये मोठी घबराहट निर्माण झाली होती. परंतु वनविभाग व पोलीस यंत्रणेने या बिबट्याला दिसता क्षणी गोळ्या घालून ठार केले आहे. त्यामुळे  करमाळा तालुक्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून जनतेने सुटकेचा निःश्वास सोडला असून शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरतभाऊ आवताडे यांनी वनविभागाचे आभार मानले आहेत

laksh

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago