करमाळा तालुक्यातील सर्वाधिक लक्षवेधक ठरलेल्या घारगाव ग्रामपंचायतीवर नारायण आबा पाटील गटाने किरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीत बागल गटाचा धुव्वा उडवत सर्व सातच्या सात जागा जिंकून एक ऐतिहासिक विजय मिळवला.
घारगाव ग्रामपंचायत स्थानापासून आजवर कोणत्याही पक्ष किंवा गटाला एक हाती सत्ता मिळाली नव्हती. सुस्थापितांना धक्का देत
ही किमया नारायण आबा पाटील गटाच्या श्री काळभैरवनाथ ग्रामविकास पॅनेल ने केली आहे.
या निवडणुकीत वाॅर्ड क्रमांक 1 मधुन सुलोचना पाटील ,अनिता भोसले, कविता होगले वाॅर्ड क्रमांक 2 मधुन आशा देशमुखे, दत्तात्रय मस्तुद, वाॅर्ड क्रमांक 3 मधुन लक्ष्मी सरवदे ,सतिश पवार हे सात उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले. मा.आमदार नारायण आबा पाटील यांनी सत्कार करत सर्व उमेदवारांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यापुढे सर्वांना विश्वासात घेऊन गावातील विकास करून गट तट न पाहता ग्रामपंचायतीचा कारभार केला जाईल असे प्रचार प्रमुख किरण पाटील यांनी सांगितले.
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…