राहुरीत अपहरण करून पत्रकाराची हत्त्या* *आरोपींना अटक करण्याची* *एस.एम.देशमुख यांची मागणी*

राहुरी
राहुरी शहरातून काल दुपारी आपल्या मोटारसायकल वरुन घरी जात असताना अज्ञातांनी त्यांचे चार चाकी गाडीत टाकुन अपहण केले होते. त्यांचा मृतदेह राहूरी कॉलेज रोडला आढळून आल्याने त्यांची हत्या झाली आसल्याचे लक्षात आले आहे त्यामुळे परीसरात एकच खळबळ उडाली आहे.
मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने या घटनेचा निषेध केला असून आरोपींना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी एस.एम.देशमुख यांनी केली आहे.
कायम बहुचर्चित असलेले राहुरी तालुक्यातील दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष रोहिदास दातीर यांनी आपल्या पत्रकारीतेच्या माध्यमातून राहुरी तालुक्यातील अनेक घटनांना वाचा फोडली. सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. राहुरी शहरातील रूग्णालयांचे अतिक्रमण, अनाधिकृत बांधकामे, स्टेशन रोड परिसरातील १८ एकरचा प्लाॅट, नगर मनमाड रोड वरील एका हाॅटेल इमारत बाबत त्यांनी आपल्या वृत्त पत्राच्या माध्यमातून रोखठोक लिखाण करून प्रशासनाला जागे केले होते. काही प्रकरणांचा खटला औरंगाबाद येथील न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणातूनच त्यांचे अपहरण झाल्याची चर्चा सुरु होती.
     रोहिदास राधूजी दातीर हे त्यांची सफेद रंगाची ॲसेस कंपनीच्या एम एच १२ जे एच ४०६३ नंबर च्या दुचाकीवरून आज दि. ६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजे दरम्यान राहुरी शहरातील मल्हारवाडी रोडने आपल्या घरी दातीर वस्ती येथे जात होते. ते सातपीर बाबा दर्गा ते पाटाच्या दरम्यान असतानाच स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या अज्ञात लोकांनी त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवून मल्हारवाडीच्या दिशेने पळवून नेले. यावेळी त्यांची दुचाकी व पायातील चप्पल घटनास्थळी आढळून आले. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या पत्नीने त्यांना मोबाईलवर संपर्क केला असता मोबाईल बंद असल्याचे आढळून आले. यापूर्वी अनेक वेळा रोहिदास दातीर यांच्यावर हल्ला झाला होता.
  घटनेनंतर त्यांची पत्नी सविता रोहिदास दातीर यांनी राहुरी पोलिसात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीसांत अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान रात्री राहूरी कॉलेज रोड परिसरात रोहिदास दातीर यांचा मृतदेह मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांना अमानुष मारहाण करून त्यांची हत्या केली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले असून हत्या कोणी व कशामुळे याचा शोध राहूरी पोलीस घेत असून मृत दातीर यांची पत्नी सविता यांनी राजकीय नेत्याच्या जवळच्या व्यक्तीने अपहरण केल्याचा आरोप केला होता. आता पत्रकार दातीर यांचा मृतदेह आढळून आल्याने पोलीस कशाप्रकारे तपास करताय हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.
saptahikpawanputra

Recent Posts

भारताचे माजी पंतप्रधान भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपच्यावतीने अंगणवाडीतील चिमुकल्यांना शालेय साहित्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…

11 hours ago

भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची गुरुकिल्ली -साध्वी प.पू अनुराधा दिदी शेटे पंढरपूरकर

करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…

2 days ago

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देवळाली येथे नेत्ररोग तपासणी संपन्न

करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…

2 days ago

अवैध वाळु उपसा बंद करा आमदार नारायण पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पञ

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…

2 days ago

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

4 days ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

5 days ago