*आ .संजयमामाच्या आमदार नीधीतुन करमाळा उपजिल्हा रुग्णालयास रुग्णवाहीका, माजी आमदार जगताप यांचे हस्ते लोकार्पण

*आ .संजयमामाच्या आमदार नीधीतुन करमाळा उपजिल्हा रुग्णालयास रुग्णवाहीका, माजी आमदार जगताप यांचे हस्ते लोकार्पण

: करमाळा प्रतिनिधी –

आ . संजयमामा शिंदे यांनी आमदार निधीतुन करमाळा तालुक्यातील रुग्णांना तातडीची सुविधा मिळणेसाठी उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशी रुग्णवाहिका दिली असून त्याचे पूजन व जनतेच्या सेवेसाठी लोकार्पण माजी आमदार जयवंतराव जगताप हस्ते करण्यात आले . यावेळी बोलताना माजी आमदार जगताप यांनी सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना भावनीक आवाहन करत कोरोना संसर्गाच्या संकटाशी मुकाबला करणेसाठी आपण सर्वांनी रुग्णांना औषधोपचार व सेवेबरोबरच मानसिक स्वास्थ्य व मनोबल उत्तम राहणेसाठी योग्य प्रकारे आत्मीयतेने व आपुलकीने रुग्णांना सेवा देत कौन्सिलींग करणेचे आवाहन केले . कारण सद्यस्थितीत सकारात्मक मानसिकता राहणे हेच प्रभावी औषध असल्याचे जगताप यांनी सांगीतले . वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, नर्सेस व अन्य स्टाफ देत असलेल्या सेवेबद्दल त्यांचे आभार देखील जगताप यांनी मानले .यावेळी माजी आ. जगताप यांनी लसीकरण, ऑक्सिजन व आयसोलेशन बेड, रेमडीसिवीर इंजेक्शन ची उपलब्धता व पुरवठा व अन्य सुविधांबाबतची पाहणी करून आढावा घेतला . लसीकरणा वेळेसची गर्दी टाळणेसाठी प्रथम डोस व व्दितीय डोस साठी आठवड्यातील दिवस ठरविणे बाबत सूचना केली . आ . संजयमामा शिंदे यांनी आमदार झाले पासून आरोग्य सेवेकडे प्राधान्याने लक्ष देत कॉटेज हॉस्पीटल येथे सिझेरीयन शस्त्रक्रिया सुरु करणे बरोबरच सातत्याने आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा करत करमाळा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालया सह अन्य प्राथमिक आरोग्य केंद्रासह आरोग्य विभागात सोयी सुविधा उपलब्ध करणेकडे जातीने लक्ष दिलेले आहे . त्याचाच एक भाग महणून आज हि अत्याधुनिक यंत्रणेने सुसज्ज अशी रुग्णवाहिका तालुक्यातील जनतेला लोकार्पण करताना निश्चितच हजारो लोकांचे यामुळे प्राण वाचून त्यांना एक चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असल्याचे गौरवोदगार आ . शिंदे यांचे बाबत माजी आमदार जगताप यांनी काढले . याप्रसंगी सामाजीक कार्यकर्ते श्रेणीक खाटेर यांनी माजी आमदार जगताप, तहसीलदार माने यांच्या आवाहनास प्रतिसाद देत ऑक्सिजन सिलेंडर टाक्या व रुग्णांना जेवणाची व्यवस्था करण्याचे जाहीर केले .या वेळी तहसीलदार समीर माने, वरीष्ठ पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, मुख्याधिकारी वीणा पवार, तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ . अमोल डुकरे,उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी, माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे, अर्बन बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी,सामाजीक कार्यकर्ते श्रेणीक खाटेर, माजी उपनगराध्यक्ष अँड. कमलाकर वीर, पं .स . सदस्य अँड राहुल सावंत, माजी पं.स. सदस्य विलास (दादा) पाटील, आदिनाथ कारखान्याचे संचालक चंद्रहास निमगीरे, रावगावचे सरपंच दादासाहेब जाधव, वाहतूक संस्थेचे चेअरमन सुजित (तात्या ) बागल,वैद्यकीय अधिकारी डॉ . राहुल कोळेकर, यांचेसह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते* .

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा इंग्लिश स्कूल संघटनेच्या नुतन तालुका अध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी  महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…

4 hours ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांना ‘ज्ञानज्योती आदर्श पुरस्कार’ प्रदान

करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…

4 hours ago

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबतर्फे गणेशोत्सवानिमित्त १६ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन – प्रशांत ढाळे

  करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…

10 hours ago

२५ सप्टेंबरपासून करमाळ्यात खत विक्रीला ‘FFS’ प्रणाली गुणनियंत्रण कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांचा विक्रेत्यांना इशारा लिंकिंग, काळाबाजार व चढ्या दराने विक्री केल्यास कडक कारवाई

करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…

1 day ago

करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न; शासनस्तरावरील नियम-अटी व विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा

करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे…

1 day ago