करमाळा प्रतिनिधी
जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळ करमाळा तालुकाध्यक्षपदी दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार दिनेश उध्दवराव मडके यांची जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या आदेशानुसार निवड करण्यात आली आहे.सोलापुर जिल्हयाचे सेवाध्यक्ष शरद मते सर जिल्हा निरीक्षक राजेंद्र भुयारसाहेब यांनी ही निवड केली असुन जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळाच्या माध्यमातून करमाळा तालुक्यात नरेंद्र महाराज संप्रदाय वाढीसाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.दिनेश मडके यांनी सात वर्षे तालुकाध्यक्ष म्हणुन चांगले काम केले असुन या कामाची दखल घेऊन त्यांची पुनश्च त्यांची निवड करण्यात आली आहे.कुणबी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष म्हणुन त्यांनी चांगले काम केले असून समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी ते सदैव कार्यरत असतात.सध्या करमाळा तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष म्हणुन कार्यरत आहेत. मराठा समाजात विवाह जमण्याचा प्रश्न गंभीर बनला असून करमाळा तालुक्यात मराठा सोयरीक संघाच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठा सोयरीक संघाचे करमाळा तालुकाध्यक्ष म्हणुन ते काम करीत आहेत.विविध सामाजिक चळवळीत ते सक्रियपणे सहभाग असल्याने त्यांना समाजातील सर्व क्षेत्रातील चांगला पाठिंबा मिळाला आहे.त्यांचा जनसंपर्क दांडगा असुन जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळाच्या माध्यमातून करमाळा तालुक्यात संप्रदाय वाढीसाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.दिनेश मडके यांची करमाळा तालुकाध्यक्ष म्हणुन निवड झाल्याबद्दल शैक्षणिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…