करमाळा प्रतिनिधी.
कोपरगाव सायकलिंग क्लब यांच्या वतीने कोपरगाव ते पंढरपूर वारी सायकल दिंडी काढण्यात आली असून यंदाचे पहिले वर्ष असून कोपरगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दौलत जाधव साहेब शिर्डी शहराचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळीसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 28 मित्रांची ही सायकल दिंडी वारी पंढरपूरला निघाली असून कोपरगाव, शिर्डी नगर,करमाळा टेंभुर्णी यामार्गे पंढरपूर या ठिकाणी दर्शनासाठी जाणार आहे या दिंडीचे स्वागत कोपरगाव शिर्डी नगर येथील नागरिकांनी स्वागत केले असून करमाळा येथे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज सेवा मंडळ व महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा यांच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष तालुकाध्यक्ष संजय घोलप तसेच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळ करमाळा तालुकाध्यक्ष पत्रकार दिनेश मडके सामाजिक कार्यकर्ते निलेश बिडवे, महादेव आण्णा फंड यांनी सत्कार करून त्यांचे स्वागत केले.
व पुढील दिंडीच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या या सायकल दिंडीमध्ये केशव होन , संदीप देवकर दिनेश कोल्हे बापूसाहेब सुराळकर विजयराव आढाव उमेश लोंढे, बाळासाहेब निकोले, मनोज आहेर, भास्कर सुराळकर कैलास शेळके प्रसाद निकुंभ प्रशांत शहाणे मनोज नेरे संतोष पवार नितीन त्रिभुवन दीपक सुपेकर राजेंद्र निकम, प्रशांत बहिरट, प्रशांत शिराळकर राजेंद्र सालके संदीप शिरोडे हे सहभागी झाले असून मानवतेच्या कल्याणासाठी व पर्यावरण समतोल राखण्यासाठी प्रत्येकानी सायकलचा वापर करणे गरजेचे आहे. आपला देश कोराना मुक्त होण्यासाठी संपुर्ण मानवतेच्या कल्याणासाठी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आपण ही दिंडी निघाली असुन दररोज शंभर किलोमीटर अंतराचा प्रवास करत आहे. आपला भारत देश कोरोनामुक्त व्हावा व संपुर्ण मानवतेचे जगाचे कल्याण होण्यासाठी पांडुरंगाच्या चरणी साकडे घालणार असल्याचे त्यांनी सांगितले.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…