संघर्षयात्री दिपक चव्हाण यांचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी दिनेश मडके

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यासारख्या ग्रामीण भागातून महाराष्ट्र प्रदेश सचिवपदापर्यंत मजल मारून दीपक चव्हाण यांनी खऱ्या अर्थाने संघर्षमय जीवनातून यशस्वी जीवन प्रवास केला असून करमाळयाचा आवाज महाराष्ट्रात गाजणार असुन दीपक चव्हाण यांचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी आहे असे मत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळ तालुकाध्यक्ष पत्रकार दिनेश मडके यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले की डर कर नौका पार नही होती कोशिश करने वाले की कभी हार नही होती हे दीपक चव्हाण यांनी आपल्या कार्यातून सर्व करमाळाकरांना दाखवून दिले आहे . भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश सचिव संघर्षमय प्रवास नक्कीच कौतुकास्पद आहे कौटुंबिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही जिद्द चिकाटी परिश्रम यांच्या जोरावर दिपक चव्हाण यांनी हे यश मिळवले आहे.सत्य परेशान है लेकीन पराजित नहीं हे आपल्या कार्यातुन दाखवून युवकांना एक प्रकारची शिकवण दिली आहे.भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या प्रदेश‌सचिवपदी दिपक चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी अमोल पवार यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा सचिवपदी निवड झाल्याबद्दल नरेंद्रसिंह ठाकुर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी भारतीय जनता पार्टी तालुका सरचिटणीस अमरजित साळुंखे, नरेंद्रसिंह ठाकुर, पत्रकार, दिनेश मडके अमोल पवार, मनोज कुलकर्णी उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

पवार जनरल हॉस्पिटलच्या विशेष आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३४० हून अधिक रुग्णांची तपासणी ऑर्थोपेडिक दंत तज्ज्ञ डॉक्टरांसह संपूर्ण टीमच्या सेवाभावाचे कौतुक

करमाळा प्रतिनिधी पवार जनरल हॉस्पिटल यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले विशेष आरोग्य शिबिर नागरिकांच्या उत्स्फूर्त…

4 hours ago

शिष्यवृत्ती परीक्षेत उर्दू शाळेच्या विद्यार्थिनींची चमकदार कामगिरी; मौलाना अबुल कलाम आझाद फाउंडेशनतर्फे सन्मान

करमाळा : प्रतिनिधी — करमाळा शहरातील कै. नामदेवराव जगताप नगरपालिका उर्दू शाळेतील विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती परीक्षेत…

7 hours ago

करमाळ्यात रंगणार उद्या बैलगाडा शर्यतींचा थरार … कृषीमंत्री मा.ना.दत्तात्रयमामा भरणे व मा.आ.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते उद्घघाटन.

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील बैलगाडा शर्यतींच्या शौकीनांसाठी यंदा मोठी पर्वणी आहे. स्व. अजितदादा पवार यांच्या…

9 hours ago

श्री कमलाभवानी मंदिरात २ हजार महिलांचा दुर्गा सप्तशती पाठ भक्तिमय वातावरणात सहस्र श्री दुर्गा सप्तशती पाठ सेवा; विश्वकल्याणासाठी सामूहिक प्रार्थना

करमाळा प्रतिनिधी श्रीदेवीचा माळ येथील श्री जगदंबा कमलादेवी मंदिरात सहस्र श्री दुर्गा सप्तशती पाठ सेवेचे…

1 day ago

नेरलेची एसटी आठ दिवसांत सुरू करा; अन्यथा ठिय्या आंदोलन औदुंबर राजेभोसले यांचा एसटी महामंडळाला इशारा; विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर

करमाळा प्रतिनिधी करमाळा–कुर्डूवाडी–नेरले मार्गावर सुरू असलेली एसटी बससेवा अचानक बंद झाल्याने नेरले परिसरातील नागरिक, विद्यार्थी…

2 days ago