देवळालीचे सरपंच आशिष गायकवाड यांनी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाचा दिला राजीनामा येत्या चार ऑक्टोंबरला करणार आमदार संजयमामा शिंदे गटात प्रवेश

करमाळा प्रतिनिधी श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा राजीनामा देत अशिष गायकवाड यांनी आमदार शिंदे यांच्या गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. बागल गटाला हा धक्का मानला जात आहे. अनेक दिवसांपासून गायकवाड हे बागल गटात होते. मात्र काही दिवसांपासून ते बागल गटापासून अलिप्त असल्याचे जाणवत होते.
आशिष गायकवाड म्हणाले, ‘आमदार संजय शिंदे यांच्याकडे विकास कामे करण्याची धमक आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्व समर्थकांचा विचार घेवुन शिंदे गटासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार शिंदे यांच्या माध्यमातून देवळालीसह पंचक्रोशीतील गावात विकासकामे करुन समस्या सोडवण्याचा प्रमाणीक प्रयत्न करणार आहे.
आज आदिनाथच्या संचालक पदाचा राजिनामा चेअरमन व कार्यकारी संचालक यांच्याकडे पाठवला आहे. ४ तारखेला मेळावा घेऊन आमदार संजय शिंदे गटात प्रवेश करत आहे.’ गेल्या काही दिवसांपूर्वी संतोष पाटील व किरण कवडे यांनीहि आदिनाथचा राजीनामा दिला.याबाबत बोलताना आदिनाथ कारखान्याचे अध्यक्ष धंनजय डोंगरे म्हणाले, गायकवाड यांचा मोबाईलवर राजीनामा मिळालेला आहे. आदिनाथ कारखाना अडचणीत असताना संचालकांनी राजीनामा देणे योग्य नाही. ते पार्टी सोडूनही जात असल्याचे समजत आहे. सध्या मी बाहेरगावी असून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

saptahikpawanputra

Recent Posts

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

2 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

5 days ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

5 days ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

6 days ago

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…

6 days ago