करमाळा प्रतिनिधी श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा राजीनामा देत अशिष गायकवाड यांनी आमदार शिंदे यांच्या गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. बागल गटाला हा धक्का मानला जात आहे. अनेक दिवसांपासून गायकवाड हे बागल गटात होते. मात्र काही दिवसांपासून ते बागल गटापासून अलिप्त असल्याचे जाणवत होते.
आशिष गायकवाड म्हणाले, ‘आमदार संजय शिंदे यांच्याकडे विकास कामे करण्याची धमक आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्व समर्थकांचा विचार घेवुन शिंदे गटासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार शिंदे यांच्या माध्यमातून देवळालीसह पंचक्रोशीतील गावात विकासकामे करुन समस्या सोडवण्याचा प्रमाणीक प्रयत्न करणार आहे.
आज आदिनाथच्या संचालक पदाचा राजिनामा चेअरमन व कार्यकारी संचालक यांच्याकडे पाठवला आहे. ४ तारखेला मेळावा घेऊन आमदार संजय शिंदे गटात प्रवेश करत आहे.’ गेल्या काही दिवसांपूर्वी संतोष पाटील व किरण कवडे यांनीहि आदिनाथचा राजीनामा दिला.याबाबत बोलताना आदिनाथ कारखान्याचे अध्यक्ष धंनजय डोंगरे म्हणाले, गायकवाड यांचा मोबाईलवर राजीनामा मिळालेला आहे. आदिनाथ कारखाना अडचणीत असताना संचालकांनी राजीनामा देणे योग्य नाही. ते पार्टी सोडूनही जात असल्याचे समजत आहे. सध्या मी बाहेरगावी असून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…