करमाळा प्रतिनिधी श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची २२ वी आँनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा आज कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर वार्षिक सर्वसाधारण सभा ही शासन नियमानुसार कोरोनाचे पार्श्वभूमीवर आँनलाईन पध्दतीने घेण्यात आली. या आँनलाईन सभेसाठी २३२ सभासदांने आँनलाईन पध्दतीत मोबाईल व्दारे आपला सहभाग नोंदवला. या आँनलाईन सभेचे प्रस्तावित कारखान्याच्या माजी चेअरमन रश्मी बागल यांनी केले. श्रध्दांजलीपर ठरावाचे वाचन कार्यकारी संचालक हरिश्चंद्र खाटमोडे यांनी केले . या आँनलाईन सभेवेळी कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन केले, सर्व विषय सभासदांनी आँनलाईन पध्दतीने बहुमताने मंजूर केले. सदर आँनलाईन सभेत सभासदांनी आपला उस्फुर्त सहभाग नोंदवला. या आँनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी कारखान्याचे व्हाईस चेअरमन अँड. ज्ञानदेव देवकर, संचालक बाळासाहेब पांढरे, महादेव गुंजाळ, संतोष देशमुख, दत्तात्रय गायकवाड, बापूराव कदम, माजी संचालक मोहन गुळवे, बाळासाहेब सरडे, संतोष पाटील, सुनिल लोखंडे, गोकुळ नलवडे, नंदकिशोर भोसले, रामभाऊ हाके यांच्या सह कार्यकारी संचालक हरिश्चंद्र खाटमोडे, कार्यालयीन अधीक्षक लहु बनसोडे, चिफ अकाउंटेंट विजय काळे आणि इतर अधिकारी उपस्थित होते…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…