मंगेश चिवटे यांचे वैद्यकीय क्षेत्रातील काम कौतुकास्पद -आरोग्य मंत्री डॉक्टर राजेश टोपे!

 

करमाळा  प्रतिनिधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष च्या माध्यमातून आत्तापर्यंत 22000 सर्जरी मोफत झाले असून कोरोना च्या काळात तर या वैद्यकीय मदत कक्षाने प्रशासनाच्या बरोबरीने काम करून सर्वसामान्याला मदत करण्याचे काम केली आहे याचे खरे श्रेय मंगेश चिवटे यांना जात असून त्यामुळेच आज त्यांना राज्य पातळीवरचा को ब कोरोना योद्धा म्हणून पुरस्कार दिला जात आहे असे मत राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर राजेश टोपे यांनी व्यक्त केले यावेळी व्यासपीठावर संस्कृतिक व वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख टीव्ही नाईन चे माजी संपादक तुळशीदास भोईटे डिजिटल मीडिया संपादक व पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने उपस्थित होते यावेळी मंगेश चिवटे यांचा सन्मानचिन्ह शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना मंत्री राजेश टोपे म्हणाले की मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष ही मूळ संकल्पना मंगेश चिवटे यांची होती या संकल्पनेला तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी गती देऊन सर्वसामान्यांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचवण्याचे काम केले त्याच धर्तीवर मंगेश चिवटे यांनी राज्यपातळीवर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मोठे काम उभे केले आहे केरळ चा महापूर सातारा सांगली कोल्हापूर येथे आलेला महापूर नुकताच विदर्भ व मराठवाड्यात झालेला महापूर यानंतर झालेल्या साठीचे रोग नियंत्रणासाठी घेतलेल्या आरोग्य शिबिरातून जवळपास दीड लाख लोकांना प्राथमिक औषधे देण्यात आली कोरोना च्या काळात अनेक रुग्णांना मोफत इंजेक्शन्स देणे बेड उपलब्ध करून देणे ऑक्सिजन व रक्त उपलब्ध करून देणे ही कामे अहोरात्र या वैद्यकीय मदत कशाने केले या संपूर्ण टीमचा प्राथमिक स्वरूपात सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले की माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे आवडते पत्रकार म्हणून मंगेश चिवटे आमच्या कुटुंबात ओळखले जात होते आजही त्यांच्या कामाचा आलेख बघून सर्वसामान्य रुग्णांना मदत बोलून द्यायची तळमळ बघून ते खरेच या पुरस्काराचे हक्कदार आहेत यावेळी बोलताना मंगेश चिवटे म्हणाले की हा सत्कार हा हा गौरव माझा नसून सर्व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या संपूर्ण महाराष्ट्रातील स्वयंसेवकांचा आहे यापुढील काळात इ जेथे जेथे आरोग्याचे मदत लागेल येथे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कार्यरत राहील असे स्पष्ट केले

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा इंग्लिश स्कूल संघटनेच्या नुतन तालुका अध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी  महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…

3 hours ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांना ‘ज्ञानज्योती आदर्श पुरस्कार’ प्रदान

करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…

4 hours ago

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबतर्फे गणेशोत्सवानिमित्त १६ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन – प्रशांत ढाळे

  करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…

9 hours ago

२५ सप्टेंबरपासून करमाळ्यात खत विक्रीला ‘FFS’ प्रणाली गुणनियंत्रण कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांचा विक्रेत्यांना इशारा लिंकिंग, काळाबाजार व चढ्या दराने विक्री केल्यास कडक कारवाई

करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…

1 day ago

करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न; शासनस्तरावरील नियम-अटी व विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा

करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे…

1 day ago