यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात स्वराज्य ध्वजाचे जंगी स्वागत

करमाळा प्रतिनिधी                                       करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या वतीने स्वराज्य ध्वजाचे जंगी स्वागत करण्यात आले. कर्जत-जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहितदादा पवार यांच्या संकल्पनेतून भारतातील सर्वात उंच 74 मीटर उंचीचा भगवा स्वराज्य ध्वज खर्डा येथील शिवपट्टण या किल्ल्यावर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर फडकवण्यात येणार आहे. या ध्वज यात्रेचे करमाळा येथे महाविद्यालयासमोर आगमन झाल्यानंतर या ध्वजाचे पूजन एनसीसी कॅंडेट सुप्रिया पवार , वृषाली गटकुळ व साक्षी भंडारे यांच्या हस्ते संपन्न झाले . यावेळी आमदार रोहितदादा पवार यांचा सन्मान विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे सर , अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , उपप्राचार्य लेफ्टनंट संभाजीराव किर्दाक, प्रबंधक कैलास देशमुख , एनएसएसचे जिल्हा समन्वयक प्रा.लक्ष्मण राख यांच्या हस्ते करण्यात आला.
या स्वराज्य ध्वज यात्रेचे महाविद्यालयाच्या एनसीसी व एनएसएस स्वयंसेवकांच्या वतीने ढोल, ताशा, हलगी व फटाक्याच्या आतषबाजीने भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. या स्वागत समारंभ प्रसंगी कर्जत जामखेडचे कर्तव्यदक्ष आमदार स्वतः भारावून गेले व त्यांनाही ढोल वाजविण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी ढोल वाजवायला सुरुवात करताच तरुण वर्ग आनंदाने बेहोश झाला.
या कार्यक्रमासाठी कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक वृंद एनसीसी व एनएसएस चे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते . सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा समन्वयक प्रा.लक्ष्मण राख, सौ. संध्या बिले, सौ. सुरेखा जाधव , सौ. नीता माने, सौ. सुवर्णा कांबळे , सौ. अनिता अंधोरे , प्रा. आनंद शेळके, प्रा. महेश निकत यांनी परिश्रम घेतले.

saptahikpawanputra

Recent Posts

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

1 day ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

1 day ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

2 days ago

निमगाव (ह )येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर अल्पदरात चष्म्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…

2 days ago

करमाळा एमआयडीसी मधील भूखंड वाटपास सुरुवात उद्योजकांनी लाभ घ्यावा जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…

5 days ago