करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरामध्ये डेंगू चिकनगुनिया यांची साथ मोठ्या प्रमाणात वाढत चालली असून साथीच्या रोगांपासून बचाव करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असे मत करमाळा नगर पालिका प्रभाग क्रमांक 3 च्या नगरसेविका बांधकाम समिती सभापती सौ. स्वाती महादेव फंड यांनी व्यक्त केले. करमाळा शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील फंड गल्ली, सुतारगल्ली, नागराज गल्ली, गवंडी गल्ली, दत्तपेठ येथीलनागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन जंतुनाशक औषधाची फवारणी तसेच नागरिकांना डेंगू आजाराविषयी सतर्क राहून कोरडा दिवस पाळुन स्वच्छतेचे नागरिकांना महत्त्व सांगितले.जंतुनाशक फवारणी करण्यासाठी आरोग्य कर्मचारी सुपरवायझर राजेंद्र बोकन मयुरलाल बेग,सुनिल म्हैतर ,घनशाम म्हैतर विक्रम म्हैतर ,पुरनलाल बेग विजयलाल बेग यांनी परिश्रम घेतले यावेळी नगरसेविका सौ स्वातीताई फंड, नगरसेवक अतुल फंड,जनतेचे नगरसेवक महादेव आण्णा फंड उपस्थित होते.
" करमाळा प्रतिनिधी : आजच्या धावपळीच्या युगात वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठमोठे कार्यक्रम, केक कापणे, फटाक्यांची…
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा पोस्ट ऑफिसमध्ये १३ जुनं रोजी आधार मेळावा आयोजित केला असुन नागरिकांनी…
करमाळा प्रतिनिधी केम (ता. करमाळा) : अल्पसंख्यांक व विखुरलेल्या ब्राह्मण समाजाने एकत्र येऊन संघटित व्हावे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा, ता. ५ जून : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त करमाळा नगरपरिषदेच्या वतीने महावीर उद्यान…
करमाळा प्रतिनिधी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या…
करमाळा प्रतिनिधी दौंड तालुक्यातील अग्रगण्य दत्तकला शिक्षण संस्था संचलित "दत्तकला कॉलेज ऑफ फिजिओथेरपी" या…