करमााळा प्रतिनिधी यशकल्याणी संस्थेमार्फत विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी आयोजित केलेली स्पर्धा ही निश्चितच विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरणार आहे. असे मत करमाळा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी व्यक्त केले . विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन वाटचाल केल्यास स्वतःचे जीवन तर यशस्वी होणारच परंतू महाराष्ट्र राज्य समृध्द झाल्याशिवाय राहणार नाही यशकल्याणी संस्थेच्या वसंत महोत्सवातील वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा अशा विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष डॉ.ॲड.बाबूराव हिरडे हे होते. प्रमुख पाहूणे म्हणून पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे, सेंट्रल बँकेचे माजी मुख्यकार्यकारी अधिकारी रशीद बागवान व तात्यासाहेब ढाणे हे होते.थोर शास्त्रज्ञ वसंतराव दिवेकर यांच्या व्दित्तीय स्मरणाच्या निमित्ताने यशकल्याणी संस्थेने वसंतमहोत्सवाचे आयोजन केले होते. यामध्ये पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वेगवेगळे गट पाडून त्यांच्या या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेसाठी विक्रमी म्हणजे जवळपास ४ हजार २६८ विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. या स्पर्धेपैकी पहिली ते चौथीपर्यंतच्या गटातील यशस्वी विद्यार्थ्यांचे बक्षीस
वितरण आज करण्यात आले. या कार्यक्रमाला यशस्वी विद्यार्थ्यासह शहर व तालुक्यातील शिक्षक वपालकांची मोठी गर्दी होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील यांनी केले. यावेळी ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष डॉ.ॲड बाबुराव हिरडे यांचेही भाषण झाले. याशिवाय स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची भाषणे घेण्यात
आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंडल अधिकारी संतोष गोसावी यांनी केले. आभार हनुमंत जाधव यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन कवि दादा पिसे,विजय दुर्गुळे-पाटील आणि भिवा वाघमोडे यांनी केले.
…..
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…