करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जातेगाव ते टेंभुर्णी या महामार्गाचा विषय नेहमीच चर्चेत असतो. या महामार्गाचे हस्तांतरण असो, नव्याने चौपदरीकरण असो किंवा या महामार्गावरती वेगवेगळे अपघात असो हा महामार्ग नेहमीच चर्चेत असतो.सध्या या महामार्गावरती पडलेले खड्डे हा चर्चेचा विषय होता. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील खड्डे मुरुमाने भुजविण्याचे काम सुरू केलेले आहे. पावसाळा संपल्यानंतर त्याचे डांबरीकरण केले जाईल, अशी माहिती तालुक्याचे आमदार संजयमामा शिदे यांनी दिली.सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता के. एम. उबाळे यांनी पावसामुळे रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम करता आलेली नाही अशी माहिती दिली. तरी सध्या जातेगाव बाजूकडून खड्ड्यामध्ये मुरूम भरण्याचे काम सुरू आहे. पावसाने पूर्णपणे उघडीप दील्यानंतर सदर खड्ड्यांमध्ये डांबरीकरण केले जाईल असे त्यांनी सांगितले.