करमाळा प्रतिनिधी करमाळा नगरपरिषदेकडून शहरात डास प्रतिबंधक औषधे व जंतूनाशकांची फवारणी .स्वतः नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी उभा राहुन जातीने लक्ष देऊन फवारणी करून घेतली . पावसाळ्या मधिल सततचा पाऊस अन् हवामानातील बदल यामूळे डासांचा फैलाव होतो व डासांचे वाढते प्रमाण डेंग्यू सारख्या आजारांना निमंत्रण देते व नागरिकांच्या आरोग्य विषयक समस्या निर्माण होतात म्हणून करमाळा नगर परिषदेने वेळीच उपाययोजना करत नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांच्या सूचनेनुसार शहरामधील सर्वच प्रभागांमध्ये डास प्रतिबंधक औषधांची व जंतूनाशकांची धूराडा व फॉगिंग मशिनद्वारे व फवारणी पंपाद्वारे फवारणी केली जाणार आहे. आज शहरातील मेनरोड , सुभाष चौक, संगम चौक , जयमहाराष्ट्र चौक, फुल सौंदर चौक आदी परिसरात ही फवारणी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप , उपनगराध्यक्ष अहमद चाचा कुरेशी , अयुब कुरेशी, अस्लम वस्ताद कुरेशी, राजू कुरेशी , ख्वाजा कुरेशी, पप्पू ओहोळ , अभिषेक आव्हाड , बाळासाहेब कांबळे, लाला घोडके , अलीम बागवान, सचिन अब्दुले सर , आदि सह नगर परिषदेचे स्वच्छता व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते .उर्वरीत भागातही ही फवारणी केली जाणार आहे. त्यामूळे डासांचा प्रादूर्भाव रोखण्यास मदत होईल. शहरातील नागरिकांनीही स्वच्छता राखावी असे नगरपरिषदेकडून आवाहन करण्यात आले आहे .
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…